Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीमंत माणसे वाचन करतात असे नसून, वाचन करणारेच श्रीमंत होतात

श्रीमंत माणसे वाचन करतात असे नसून, वाचन करणारेच श्रीमंत होतात
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (11:55 IST)
जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्यक असते, तसेच उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे, आवश्यक असते. जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे, तो वाचनामुळं आणि आता जगाचा ऱ्हास होत आहे, तो टीव्ही मोबाइलच्या अतिवापरामुळे. पुस्तक वाचणारं माणूस कधी व्यसन करत नाही. टीव्ही -मोबाईल हेच मुळी व्यसन आहे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टीव्ही -मोबाईल मुळे माणूस Adicted होतो. टीव्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो. वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.
 
वाचन करणारा माणूस शांत असतो. त्यामुळं त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे, अशा गोष्टी संभवत नाहीत या उलट जास्त टीव्ही-मोबाइल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे. टीव्ही- मोबाईलमुळं मन: शांतीचा भंग होतो, तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते. वाचन करणारा पुढं उद्योजक होतो, तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो. 
 
काही महाभाग तर नोकरी लागली की जगातील मी एकटाच सिकंदर! आता मलाच सारे काही कळते, अशा नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात. वाचन करणारा माणूस लवकर झोपतो, लवकर उठतो, टीव्ही -मोबाइल चक्करमध्ये अडकणारे उशिरा झोपतात, ती उशिराच उठतात, परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते .लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य लाभे ,अशी एक म्हण प्रचलित आहे.
 
वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो,तर वाचन टाळणारा ,बारा तास काम करणारा, गरिबीतच मरतो. वाचनामुळे माणूस नम्र होतो, तर टीव्ही मूळे माणूस भांडखोर. मोबाइलमूळे आत्मकेंद्री होतो. जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते, तेच खरे पुस्तक व जे कृती करायला लावते, तेच खरे वाचन.
 
आपल्या आयुष्यात दोन गोष्टीचा प्रभाव पडतो. एक मित्र व दुसरे पुस्तक. पुस्तकाला आपलं मित्र बनवा. टीव्ही बघणारे केवळ स्वप्नरंजन करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टीव्ही मोबाईलमूळे थकवा येतो, तर वाचनामुळे तरतरी. जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही, तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरविता येते आणि गाठताही येते.
 
तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते व तुम्ही किती मोठे ध्येय ठरवता, ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते. ज्याना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं, तेच लोक पुस्तक वाचत नाही आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचन वेगळं.
 
जगात जेवढे लोक उपास मारीने मेलेत ,त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातुन ज्ञान  आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होते. म्हणून वाचलं तर वाचाल आणि वाचाल तर वाचवाल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण आहे डॉ स्वाती मोहन, ज्यांनी मंगळाच्या सर्वात धोकादायक अभियानावर NASAला यश मिळवून दिले