Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण छिद्र कसं तयार झालं?

earth
, मंगळवार, 11 जुलै 2023 (21:42 IST)
पृथ्वीवर 'गुरुत्वाकर्षण छिद्र' आहे. ते कसं आणि कधी तयार झालंय हे तुम्हाला माहिती आहे का? या गुरुत्वाकर्षण छिद्रानं लाखो वर्षांपूर्वी टेथिस महासागर गिळंकृत केला होता .
 
जेव्हा प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमात आपल्याला पृथ्वी विषयी माहिती दिली जाते, तेव्हा सांगिलतं जातं की तिचा आकार ध्रुवांवर सपाट केलेल्या गोलासारखा आहे. तिचं गुरुत्वाकर्षण 9.8 (m/s2) मीटर प्रति सेकंड वर्ग आहे.
 
वास्तविक पृथ्वी ही बटाट्या सारखी आहे .तो एकसंध गोल नाही, तर अनेक उंचसखलपणा असलेला भूगर्भ आहे. त्याची घनता जगाच्या प्रत्येक प्रदेशानुसार बदलते आणि म्हणूनच, गुरुत्वाकर्षण सर्वत्र सारखं नसतं.
 
पृथ्वीवर असे काही भाग आहेत जिथं गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी मानकं बदलतात.
 
जेव्हा गुरुत्वाकर्षणाचं मूल्य मानका पेक्षा अधिक असतं, तेव्हा या भिन्नतेला विसंगती म्हणतात.
हिंद महासागराच्या खाली पृथ्वीच्या आवरणात वस्तुमान कमी झाल्यामुळे 'गुरुत्वाकर्षण छिद्र' तयार झाल्याचं सांगण्यात आलं.
 
या प्रदेशात "गुरुत्वाकर्षणात मोठी विसंगती आहे, ही पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाची घटना आहे, असं ओव्हिडो विद्यापीठातील भूविज्ञान तज्ज्ञ डॉक्टर गॅब्रिएला फर्नांडीस व्हिएजो यांनी बीबीसीला सांगितलं.
 
पण तज्ज्ञाच्या मते हे छिद्र असे क्षेत्र नाही की ज्यात वस्तू बुडतील किव्हा वेगाने पडतील. हे छिद्र दृश्यमान देखील नाही
 
जहाजांवरील गुरुत्वाकर्षण मोजणाऱ्या मीटरने ही विसंगती अनेक दशकांपूर्वी मोजली होती. अत्याधुनिक उपग्रहाद्वारे ती तपासलीय. परंतू ही घटना का घडली याचं स्पष्टीकरण मिळालं नाही.
 
गुरुत्वाकर्षण छिद्र म्हणजे काय ?
गुरुत्वाकर्षण छिद्र हे पृथ्वीच्या जिओ आयडीवरील सर्वांत छोटा बिंदू आहे. जो भारतीय उपखंडाच्या दक्षिणेला हिंदी महासागरात आहे.
 
गुरुत्वाकर्षण छिद्र वर्तुळाकार असून समुद्र सपाटीपासून 105 मीटर खोल आहे. आणि त्याचा विस्तार 3 दशलक्ष चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे.
 
पृथ्वीवरील सर्वांत कमी गुरुत्वकर्षणाची नोंद करणारी जागा कशी तयार झाली असावी याबाबत अनेक गृहितकं आहेत.
 
गुरुत्वाकर्षण हे वस्तुमानाच्या प्रमाणात आहे. या भागातील कमी वस्तुमान दर्शवतं की येथील गुरुत्वाकर्षण हे कमी आहे. या भागात कमी गुरुत्वाकर्षण का आहे याबाबत प्रत्येक संशोधकाचं एकमत नाही .
 
गुरुत्वाकर्षण छिद्राविषयी अनेक गृहितकं
फर्नांडीस यांचं म्हणणं आहे की हिंदी महासागरात गुरुत्वाकर्षण कमी असल्याने महासागरांच्या प्लेट्स एकमेकांवर आदळतात आणि खाली जातात.
 
या भागातीळ स्लॅब हा प्राचीन आहे. प्राचीन टेथिस महासागरातून हा भाग तयार झाला आहे. टेथिस महासागर गोंडवाना आणि लॉरेशिया खंडाच्या दरम्यान होता.
 
भारतीय उपखंडाची प्लेट ही गोंडवाना पासून वेगळी झाली आणि भारतीय उपखंडाच्या प्लेटशी युरेशिया प्लेटची टक्कर झाली तेव्हा टेथिस महासागर तयार झाला होता .
 
फर्नांडीस पुढे सांगतात की भूकंपाचा डेटा, येथील घनता आणि तापमान याच्या माहितीद्वारे सिद्ध होतं. गुरुत्वकर्षणाची विसंगती ही केवळ स्लॅबमुळे झाली असं सांगितलं जातं. मात्र इतर भूगर्भीय घटनांचा विचार करण्यात आला नाही. जसं की या भागात भूकंप प्रवण क्षेत्रही आहे.
 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे भू वैज्ञानिक देबोन्जेल पाल आणि अत्रेयी घोष म्हणतात, मागील अभ्यासकांनी विसंगती पाहली पण ती कशी उद्भवली ते जाणून घेतलं नव्हतं.
 
नव्या मॉडेलद्वारे शोध
मेसोझेक युगातील प्लेट्सच्या निर्मितीच्या पलीकडे या विसंगतीचं मूळ शोधण्यासाठी पाल यांनी काही वर्षं घालवली .
 
मेसोझेक युगातील प्लेट्सच्या निर्मितीचं मूळ शोधण्यात पाल यांनी अनेक वर्षं घालवली. त्यांनी यासाठी संगणक प्रणाली वापरून एक मॉडेल तयार केलं. ते अधिक विश्वसनीय आहे असा फर्नांडीस यांचा दावा आहे. भूकंपाच्या वेगावरील डेटा मुळं हे स्पष्ट होतं, असं फर्नांडीस सांगतात. टेक्नोटिक प्लेटमध्ये हालचाली का झाल्या तेही या डेटा मुळे कळतंं.
 
पाल यांच्या टीमने गेल्या 140 दशलक्ष वर्षांच्या टेक्निटिक प्लेटच्या हालचाली आणि पृथ्वीच्या आवरणातील बदलांसाठी 19 भिन्न परिस्थितीचा अभ्यास केलाय.
 
पृथ्वीच्या आवरणाचा चिकटपणा, घनता, तापमान, प्लेट्समधील झालेले बदल या मापदंडांचा वापर त्यांनी केला. तसंच उपग्रहांद्वारे निरीक्षण करून पृथ्वीच्या भूगर्भाचा अभ्यास करण्यात आला. हिंद महासागराचा जिओ आयडी आकार आणि व्याप्ती या डेटाशी जुळून येते .
 
यासाठी 19 वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार करण्यात आला होता. त्यातील 6 नैसर्गिक परिस्थिती जुळून येताहेत.
 
गुरुत्वाकर्षण छिद्र तयार होण्याची प्रक्रिया कशी घडली?
गुरुत्वाकर्षण छिद्र कसं तयार झालं यासाठी टेथिस महासागराच्या प्लेट्सचाच अभ्यास महत्त्वाचा होता, पण पाल आणि घोष यांच्या अभ्यासाच्या नव्या प्रणालीमुळे त्याची गरज उरली नाही.
 
जेव्हा भारतीय प्लेट युरेशिया प्लेटशी टक्कर देण्यासाठी पुढे गेली, तेव्हा त्यात महासागर निर्माण करण्यासाठी टेथिस प्लेट आवरणात बुडाली. पण आफ्रिका खंडाची प्लेट ही एका बाजूला होतीच.
 
काही दशलक्ष वर्षांमध्ये टेथिस प्लेट खालच्या अवरणामध्ये सरकली आणि आफ्रिकेच्या दिशेने प्रवास केला. जिथे तिचा पूर्व आफ्रिकेच्या दिशेने गरम मॅग्मा प्रदेशाशी संबंध आला, असं फर्नांडीस सांगतात .
 
थंड प्लेट आणि उबदार प्लेट यांच्यातील परस्पर संबंधाने एक अडथळा निर्मण होतो आणि एक गुरुत्वाकर्षणाची विसंगती तयार होते .
 
हा भाग मॅंटल प्लुम्स म्हणून ओळखला जातो. हा एक गरम मॅग्मा आहे. तज्ज्ञांच्या मते भारतीय केंद्रानं बनवलेलं नवीन मॉडेल हे भूवैज्ञानिक इतिहास, वस्तुनिष्ठ डेटा हा प्लेट टेक्टॉनिक्सच्या सिध्दांताला पूरक आहे.
 




Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इलॉन मस्कच्या ट्विटरपेक्षा थ्रेड्स अधिक पैसे कमावणार का?