Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Blood Donor Day रक्तदान महादान: महत्त्व, फायदे, नियम जाणून घ्या

webdunia
गुरूवार, 11 जून 2020 (12:57 IST)
रक्तदान हे महादान आहे ते जीवनदायी देखील मानले जाते. रक्तदान निव्वळ रक्त घेणाऱ्याच्या आयुष्याला वाचवतच नाही पण हे रक्ताचे दान करणाऱ्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
 
रक्तदान महादान आहे ह्याला जीवन देणगीच्या सम मानले जाते. रक्तदान हे निव्वळ जीवनाचे रक्षणच करीत नाही तर रक्तदान देणाऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत ही करतो. म्हणून हे दोघांसाठी फायदेशीर आहे. डॉक्टरांप्रमाणे रक्तदान ही एक जीवदायी क्रिया आहे जे कोणाही व्यक्तीच्या आयुष्याला वाचवू शकतं. म्हणून जेव्हाही संधी मिळेल सर्व निरोगी असणारे पुरुष आणि बायकांनी रक्तदान करायला हवं. 
 
रक्तदानाबाबत तज्ज्ञाचा सल्ला :
रक्त हे एक महत्वाची धातू असून रक्तदानामुळे शरीरामध्ये नवे रक्त पुनर्जीवित करण्यास मदत होते. पित्त प्रकृतीने त्रासलेल्या बायकांना रक्तमोक्षण पंचकर्म थेरेपीचा सल्ला दिला जातो. म्हणूनच रक्तदानामुळे पित्तप्रकृती असलेल्या बायकांना रक्तमोक्षणासम फायदे मिळू शकतात. 
 
रक्तदात्यांना पौष्टिक आणि निरोगी आहार आणि भरपूर विश्रांती घेणे महत्वाचे आहे जेणे करून नव्या रक्त पेशी तयार होऊ शकतील. नाही तर अश्याने शरीरामध्ये रक्ताची कमतरता होऊ शकते. 
 
रक्तदानाचे फायदे 
हे शरीरामधील जास्तीचे लोह (आयरन) काढून टाकण्यासाठी योग्य उपाय आहे.
या व्यतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याची मदत 
रक्तदानानाने शरीरामधील रक्त पेशींची संख्या कमी होते. याची भरपाई करण्यासाठी शरीर बोनमॅरोला नव्या लालपेशींचे कण बनविण्यासाठी प्रेरित करतात. ज्यामुळे शरीरात नव्या पेशी तयार होतात आणि आपले सिस्टम रिफ्रेश होतं.
रक्त देण्याने शरीरामध्ये नवे रक्त आणि पेशी बनतात जे रक्ताला पातळ करतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर बनते, हे चेहऱ्यावरील मुरूम, डाग कमी करून चेहऱ्याची सौंदर्यता वाढवतात.
 
कोण करू शकतं रक्तदान 
18 ते 60 वयोगटातील निरोगी लोक रक्तदान करू शकतात.
रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण 12.5 ग्राम/ डीएल पेक्षा कमी नसावे.
रक्तदात्याचे वजन 45 किलो पेक्षा कमी नसावे. 
रक्तदात्याला श्वास, त्वचा किंवा हृदयाचे आजार नसावे.
दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करता येते.
 
रक्तदान कोण करू शकत नाहीत
रक्तदात्याने आधीच्या 3 दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असल्यास.
मागील 3 महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
मागील 1 वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास.
6 महिन्यापूर्वी त्याची मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
गर्भवती महिला, महिलेला 1 वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा 6 महिन्यात गर्भपात झाला असल्यास.
 
ब्लड प्रेशर लो किवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पहावी.
उपाशीपोटी किवा खाऊन झाल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये.
इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

यंदा गणेशोत्सवात मिरवणुका नाही