जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय.
कुटुंब हे झाडासारखं असतं जे कडक उन्हात सावली देतं.
कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.
आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे.
कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे.
एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं.
कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे.
तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता.
कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा महत्त्वपूर्ण काहीच नाही.
तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो.
घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात.
पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता मिळते.
प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचं सुखी कुटुंब असतं.
जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.
जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल.
पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो.