Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरुषांनी गुपित ठेवाव्या या 4 गोष्टी

पुरुषांनी गुपित ठेवाव्या या 4 गोष्टी
आचार्य चाणक्य द्वारे सांगितलेल्या अनेक गोष्टी वर्तमान परिपेक्ष्यात देखील अचूक वाटतात. त्यांनी सांगितलेल्या नीतीप्रमाणे पुरुषांनी काही रहस्य गुपितच ठेवावे. जाणून घ्या कोणत्या गोष्टी पुरुषांनी इतर कुणासमोर प्रदर्शित करु नये त्या:
 
पैशांसंबंधी बाब
पुरुषांनी आपल्या पैशासंबंधी विस्तृत माहिती इतर बाह्य लोकांना सांगू नये. पैशांची संबंधी नफा-नुकसान बाहेरच्या लोकांना सांगिल्याने उलट समोरचा जाणून समजून आपल्याशी जवळीक किंवा दूरी साधू शकतो.
 
बायकोची तक्रार
नवरा- बायकोमधील खाजगी गोष्टी कोणालाही कळता कामा नये. दोघांमधील नकारात्मक गोष्टी बाहेर पसल्यास लोकं थट्टा करण्याव्यतिरिक्त दुसरी कुठलही मदत करणार नाही. आपल्या बायकोने स्वत:मध्ये सुधार केल्यानंतर देखील तिला कुणी सन्मानाच्या दृष्टीने बघणार नाही.
 
दु:ख
अनेक लोकांना सवय असते की आपली खाजगी समस्या, दु:ख दुसर्‍यासमोर मांडून लाचार असल्याचे दर्शवतात. परंतू कुणालाही आपल्या समस्या सोडवण्यात रस नाही हे जाणून घेतलं पाहिजे. मदत तर सोडा उलट ते चारचौघात आपली समस्या सांगून आपल्याला खाली बघायला भाग पाडू शकतात.
 
अपमान
एखाद्या मूर्ख, अक्कलहिन व्यक्तीने आपला अपमान केला असल्यास या घटनेबद्दल इतर कुणाला सांगू नये. याने आपल्या मान-सन्मानात कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
अहंकार
चाणक्यानुसार अहंकारामुळे आत्मविश्वास कमी होत जातो आणि अहंकार ठेवणे कधीही योग्य नाही. असे केल्याने व्यक्ती स्वत:मध्ये गुंतून राहतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गूगल नेस्ट हबमध्ये मिळेल टचस्क्रीन डिस्प्ले आणि वूफर स्टीरियो स्पीकर्स, किंमत फक्त 9999 रु