नोबेल पारितोषिक दिवस हा दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो. १० डिसेंबर १८९६ याच दिवशी 'डायनामाइट' चे संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते आल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले होते. आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ आणि मानवतेच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा गेला आहे.
मुख्य वैशिष्ट्ये
पुरस्काराचे वितरण-
दरवर्षी १० डिसेंबर रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील नोबेल पुरस्कारांचे वितरण केले जाते.
शांतता पुरस्काराचे वितरण-
फक्त शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिला जातो.
सुरुवात-
पहिल्या नोबेल पुरस्काराचे वितरण १० डिसेंबर १९०१ रोजी करण्यात आले.
पुरस्काराची प्रेरणा-
आल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंता होते, ज्यांनी 'डायनामाइट' या स्फोटकाचा शोध लावला. 'मृत्यूचा व्यापारी' (Merchant of Death) म्हणून आपली ओळख होऊ नये, तसेच त्यांच्या स्फोटकांच्या विध्वंसक वापरामुळे त्यांना झालेल्या पश्चात्तापातून त्यांनी त्यांची बहुतांश संपत्ती एका निधीसाठी दान केली. त्यांच्या इच्छेनुसार, या निधीतून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी मानवजातीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थांना हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. हा दिवस विज्ञान, साहित्य, शांतता आणि मानवी कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर सन्मान करण्याचा दिवस आहे.
हा दिवस का साजरा केला जातो?
आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या मृत्युपत्रात आदेश दिला होता की त्यांच्या संपत्तीचा बहुतांश भाग (अंदाजे ९४%) एका ट्रस्टमध्ये ठेवला जावा. या ट्रस्टमधून मिळणारे व्याज दरवर्षी मानवतेसाठी सर्वात मोठे काम करणाऱ्यांना बक्षिसे देण्यासाठी वापरावे. नोबेल पारितोषिक नोबेलच्या मृत्यूच्या अगदी पाच वर्षांनी, १९०१ मध्ये प्रदान करण्यास सुरुवात झाली.
नोबेल पारितोषिकाचे सहा प्रकार
भौतिकशास्त्र
रसायनशास्त्र
शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र
साहित्य
शांती
अर्थशास्त्र
भारतीय नोबेल पारितोषिक विजेते
पहिले भारतीय नोबेल पारितोषिक विजेते: रवींद्रनाथ टागोर (१९१३, साहित्य) आजपर्यंत, भारतात जन्मलेल्या किंवा भारतीय वंशाच्या १२ जणांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. १० डिसेंबर रोजी, भारतातील अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि वैज्ञानिक संघटना नोबेल दिनानिमित्त चर्चासत्रे, व्याख्याने आणि प्रदर्शने आयोजित करतात. म्हणूनच, १० डिसेंबर हा केवळ अल्फ्रेड नोबेलची पुण्यतिथी नाही तर विज्ञान, साहित्य आणि शांतीमधील मानवतेच्या महान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी जगभरातील दिवस आहे.
Edited By- Dhanashri Naik