rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

World Human Rights Day
, बुधवार, 10 डिसेंबर 2025 (09:47 IST)
जागतिक मानवी हक्क दिन दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तसेच दुसऱ्या महायुद्धातील अत्याचारांमुळे मानवी हक्कांचे महत्त्व 'आंतरराष्ट्रीय प्राधान्य' बनले होते. तेव्हापासून, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन दरवर्षी १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणा (UDHR) स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

उद्देश
या घोषणेमध्ये वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीला जन्मसिद्ध असलेले हक्क आणि स्वातंत्र्य नमूद केले आहे. यात जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, समानता आणि सन्मानाचा अधिकार यांचा समावेश होतो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील नागरिकांना त्यांच्या मानवी हक्कांबद्दल जागृत करणे आणि त्या हक्कांचे महत्त्व समजावून सांगणे आहे. तसेच सर्व लोकांना सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. तसेच भारताच्या संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्कांची हमी दिलेली आहे.

इतिहास आणि महत्त्व
१९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने १० डिसेंबर १९४८ रोजी जागतिक मानवी हक्कांची जाहीरनामा (Universal Declaration of Human Rights - UDHR) स्वीकारला. हाच जाहीरनामा मानवी हक्कांचा पहिला आंतरराष्ट्रीय दस्तऐवज आहे, ज्यात ३० कलमांमध्ये प्रत्येक व्यक्तीला मिळणारे मूलभूत हक्क नमूद केले आहे जसे की जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानता इत्यादी. १९५० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव पास करून १० डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

महत्त्वाचे मुद्दे
हा दिवस केवळ साजरा करणे नव्हे तर जगभरात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी आवाज उठवणे, त्याविरुद्ध लढणे हा आहे. यात बालहक्क, स्त्री हक्क, अल्पसंख्याक हक्क, शरणार्थी हक्क, कामगार हक्क यांचा समावेश होतो. "सर्व मानव स्वतंत्र जन्माला येतात आणि त्यांना समान प्रतिष्ठा व समान हक्क आहे."
ALSO READ: एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: महात्मा जोतिबा फुले संपूर्ण माहिती Mahatma Jyotirao Phule

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द