नको, नाही म्हणता आलंच पाहिजे,
नको त्या आमिषाला, दूर ठेवता यायला पाहिजे!
लहानपणी सुरू होतो, हा दुर्दैवी प्रवास,
पहिले गंमत म्हणून, मग आवळतो त्याचा फास,
जे खाण्यायोग्य नाही ते का खावं बरं,
तंबाखू ने कुणाचं भलं झालं नाही हेच खरं,
दूर जा मंडळी या जीवघेण्या विळख्यातुन,
जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या हो भरभरून!!
....जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त !
...अश्विनी थत्ते