rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक रुपयांची नोट झाली अवघी १०० वर्षांची

One rupee note was just 100 years old
, गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (14:54 IST)
हो.आपल्या देशात प्रधीर्घ  काळापासून सुरु आहे चलनातील एक रुपयांची नोट. तिला आज ३० नोव्हेंबर रोजी ती शंभर वर्षाची झाली आहे. अर्थात एक रुपया आपल्या चलनात १०० वर्ष पूर्ण करत आहे. ही नोट ३० नोव्हेंबर १९१७ रोजी ब्रिटीश सरकारने भारतात सुरु केली होती. या नोटेवर राज जॉर्ज ५ याचे चित्र होते.भारताने १९९४ साली एक रुपयांच्या नवीन नोटा बंद केल्या होत्या. मात्र नागरिकांनी सरकारवर दबाव आणला आणि २०१५ रोजी या नोटा पुन्हा भारत सरकारने छ्पल्या आहेत. याचे विशेष म्हणजे आपली नोट १९७० च्या काळात अनेक आखाती देशात वापरत होती. तर एक रुपयांची एकमेव नोट आहे ज्यावर govrnment of India असे नमूद असते तर इतर सर्व नोटांवर Reserve Bank Of India असे नमूद केलेलं असत. या नोटेवर गव्हर्नर नाहीत तर अर्थ सचिव सही करतात त्यामुळे आर बी आय नोटेची १०० वर्ष साजरी करणार नाही. मात्र त्याने काही फरक पडणार नाही नागरिकांना त्यांची एक रुपयांची नोट आजही खूप आवडते अनेकांनी या नोटा खूप वर्षापासून जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे नागरीक नोटेच्या १०० बद्दल खुश आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंटरनेट स्लो असले तरी व्हिडिओ बघता येणार