Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

Parents Day 2023 Wishes in Marathi : पालक दिनाच्या शुभेच्छा

Parents Day Wishes 2023
, रविवार, 23 जुलै 2023 (12:55 IST)
देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव 
ज्यांच्यामुळे आम्ही आमच्या पायावर उभं आहोत आहे
माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा
 अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे
अशा माझ्या पालकांना 
पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आई - वडीलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताचं मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही...
जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही...
आई पेक्षा मोठं जग कोणतचं नाही..
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
मनातलं जाणणारी आई
भविष्य ओळखणारा बाप
अजून काय हवं जीवनात
जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
मातृ देवो भव...
पितृ देवो भव
जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
वेळ बदलते,काळ बदलतो 
परिस्थिती बदलते, माणसं बदलतात
पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही
कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
निस्वार्थ प्रेम आणि त्याग
याचे एकतर्फी वचन पाळून
मुलांचे सुयोग्य संगोपन करणार्‍या
सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
 
मुलांच्या आयुष्यात पालक महत्वाची भूमिका बजावतात..
ज्या दिवशी आम्ही जन्मतो त्या दिवसापासून पालक आमचे,
संरक्षक, शिक्षक, प्रदाते आणि आदर्श आहेत..
सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिवसाच्या शुभेच्छा!
 
आई-वडीलांचा हात धरुन ठेवा
कधीच लोकांचे पाय पडण्याची वेळ येणार नाही
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
 
स्वत:चे डोळे मिटेपर्यंत
जी प्रेम करते तिला आई म्हणतात
पण डोळ्यात प्रेम न दाखवता
जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
 
आई वडिलांच्या कष्टाची 
जाणीव असणारी व्यक्ती कधी 
वाया जात नाही 
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
 
देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा
 


Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Twitter Logo: ट्विटर पक्षी लोगो हटवणार! मस्कने ट्विटमध्ये दिले संकेत