Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डाव्या बाजूलाच का असतात महिलांच्या शर्टची बटणे?

डाव्या बाजूलाच का असतात महिलांच्या शर्टची बटणे?
आपल्या अनेकदा लक्षात आले असेल की, पुरूषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला तर महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात. असे का असते याबाबत कदाचीत खूपच कमी लोकांना माहिती असते. पण आता याचे कारण कळले असून खरेतर तर्क आणि दंतकथेवरच आधारीत हे कारण आहे. 
पूर्वीच्या काळी पुरूषांच्या आणि महिलांच्या पोषाखात फरक असे. त्यांना स्वत:असा वेगवेगळा पोषाख असे. त्यांच्या जबाबदाऱ्याही विभागलेल्या असत. पुरूष लढाई, संरक्षण आणि कष्टाची कामे करत असत. महिलाही कष्टाची कामे करत असत. पण त्यात फरक असे. बर्‍याचदा पुरूष लढाईवर असत. त्या काळी डाव्या हतात शस्त्र किंवा तलवार पकडायची पद्धत होती. त्यामुळे शर्टची बटणे घालताना त्यांना उजव्या हाताचा वापर करावा लागत असे. त्यामुळे पुरूषांच्या शर्टला उजव्या बाजूला बटणे असतात असे सांगितले जाते. 
 
महिलांच्या बाबतीत बोलायचे तर, महिला घरकाम आणि मुलांचे संगपण करत असत. अशा वेळी महिलांच्या उजव्या कडेवर मुल असायचे. बहुतांश महिला आजही मुल उजव्याच कडेवर घेतात. त्यामुळे शर्टची बटने घालण्यासाठी त्या डाव्या हताचा वापर करत असत. म्हणून महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात.
 
या पद्धतीला नेपोलियनचा आदेश जबाबदार असल्याचे काही लोकांचे मत आहे. नेपोलियनला एक हात शर्टमध्ये टाकून उभे रहायची सवय होती. त्याच्या या स्टाईलची महिला टिंगल करत असल्यामुळे नेपोलियनाल राग येत असे. म्हणून चिडलेल्या नेपोलियने महिला आपल्यापेक्षा वेगळ्या दिसाव्यात यासाठी महिलांच्या शर्टला डाव्या बाजूला बटणे ठेवण्याचा आदेश दिला. परंपरेने चालत आलेल्या प्रथा परंपरेला बर्‍याचदा उत्तरे नसतात. त्याबाबत विशेष माहितीही नसते. पण त्या चालत आलेल्या असतात. त्या काही दंतकथांवर आधारलेल्या असतात. त्याचा आपापल्या परीने अर्थ लावून घेणे इतकेच आपल्या हाती असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिल गेट्‌स यांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक