स्वीडनमध्ये आईस हॉटेल 365 नावाचे जगातील पहिले संपूर्ण बर्फाचे हॉटेल लवकरच सुरू होणार आहे. या हॉटेलमध्ये 55 खोल्यांची तर 20 डिलक्स सूट्सची सोय आहे. यासाठी टोर्न नदीचे 30 हजार लीटर पाणी गोठवण्यात आले आहे.
वर्षभर हा बर्फ गोठलेला असावा यासाठी सोलर पॉवर रेफ्रीजरेंटिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. हॉटेलच्या अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलचे काम लवकरच पूर्ण होणार असून हॉटेल व्यवस्थापन उद्घाटनाला येणार्या सर्वांच्या पाहुणचारासाठी सज्ज आहे.
या आईस हॉटेलमध्ये स्वत:ची बर्फाची शिल्पे बनवण्याचा तसेच टोर्न नदीत पोहण्याचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. या हॉटेलमधील आणखी एक आकर्षण म्हणजे 40 कलाकारांनी केलेल्या बर्फाच्या विविध कलाकृती.
या हॉटेलच्या बांधणीविषयी, त्यातील बारकावे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर येथे हॉटेलचे डिझायनर्स, आर्किटेक्ट आणि बिल्डरला भेटण्याची संधी देखील मिळणार आहे.