भारतीय होमग्राउन डेनिम ब्रँड ने रुबरू बरोबर बाल लैंगिक अत्याचारासाठी जागरूकता मोहिमेमध्ये सहभागी आहे
स्पायकर लाइफस्टाईलने मुंबई मॅरेथॉन २०२० साठी बाल लैंगिक अत्याचाराच्या क्षेत्रातील नामांकित स्वयंसेवी संस्था रुबरू यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. या ब्रॅण्डने स्वयंसेवी संस्थेतील सहभागींना मॅरेथॉनमधील ड्रीम रनचा भाग म्हणून सक्षम बनवले आहे. स्पायकर सहभागींच्या शौर्य आणि धाडसाला सलाम करते आणि त्यांना धावण्यासाठी तयार करण्यासाठी टी-शर्ट आणि मॅरेथॉन किट देणार आहे.
“मुंबई मॅरेथॉन जगातील पहिल्या 10 मॅरेथॉनमध्ये गणले जाते. यामध्ये तरुण आणि उत्साही मुंबई शहराची भावना आहे. रुबरू गेल्या 6 वर्षांपासून बाल-अत्याचारातून वाचलेल्यांना मदत करत आहेत आणि मुंबई मॅरेथॉनमधील सहभागामुळे त्यांना शहराचा आत्मा अनुभवण्यास व्यासपीठ मिळेल. उद्याच्या तरुण आणि उत्साहीना मदतीचा हातभार लावण्यासाठी आम्ही सहभाग घेतल्याचा आम्हाला आनंद आहे, असे ”स्पायकर लाइफस्टाइलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वकारीया म्हणाले.
टाटा मुंबई मॅरेथॉन २०२० मधील सहभागाच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार आणि एकूणच समाजावर होणारे विनाशकारी परिणाम यांच्या विरोधात लढा देणारी रुबरू ही एक संस्था आहे. त्यांच्या युनाइटेड # एन्डसीएसए मोहिमेने बाल लैंगिक अत्याचारावरील शांतता मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आवाज एकत्र केले आहेत. स्पायकर हे तारुण्याचे प्रतीक म्हणून मोहिमेला अधिक उत्साही करीत आहे आणि तरुण आवाज असण्याचे महत्त्व सामाजिक परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे.