Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vikram Sarabhai भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई

Vikram Sarabhai
Vikram Sarabhai डॉ. विक्रम अंबालाल साराभाई हे एक सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. 12  ऑगस्ट 1919 मध्ये जन्मेले विक्रम साराभाई ह्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाला जन्म दिला. ह्यांचा जन्म अहमदाबाद येथील एक धनाढ्य व्यावसायिक कुटुंबात झाला होता. ह्यांचे वडील अंबालाल साराभाई आणि आई सरला देवी होत्या. ह्यांचे वडील खूप मोठे व्यापारी होते.
 
भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ह्यांनी देशाला अंतरिक्षमध्ये पोहोचण्यात खूप मदद केली आणि देशात परमाणू शक्ती विकसित करण्यामध्ये देखील आपले योगदान दिले. डॉ. विक्रम साराभाई ह्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या मार्गदर्शनात cosmic rays ह्यावर शोध केले. त्यांनी आपला पहिला संशोधन लेख "टाईम डिस्ट्रिब्युशन ऑफ कॉस्मिक रेज्" प्रोसिडिंग ऑफ द इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित केला. साराभाई यांनी 1940-45 या कालावधीत वैश्विक किरणांवरील संशोधन कार्यामध्ये बेंगळुरू येथील गीगर-मुलर काउंटर आणि काश्मीर-हिमालयातील उच्चस्तरीय केंद्रावरील वैश्विक किरणांच्या काळातील फरकांचा अभ्यास केला.
 
1966 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा ह्यांच्या निधनानंतर डॉ. विक्रम साराभाई ह्यांना भारतीय अणुऊर्जा आयोगचे अध्यक्ष बनवले गेले. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था (इसरो) ह्याची स्थापना यांनी केलेल्या अनेक महत्वाच्या कार्यांपैकी सर्वात मोठी उपलब्धी आहे. रशियन उपग्रह 'स्पुतनिक' ह्याचे प्रक्षेपणानंतर भारतासारख्या विकास शील देशासाठी अंतराळ कार्यक्रमाचे महत्वाबद्दल त्यांनी सरकारला कळवली. डॉ. विक्रम साराभाई हे अंतराळ कार्यक्रमाच्या महत्त्वावर जोर देऊन म्हणाले-
 
“राष्ट्राचा विकास हा तेथील लोकांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आकलनाशी आणि वापराशी घनिष्ठपणे जोडलेला आहे.”
 
डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या भारतीय उपग्रह 'आर्यभट्ट' च निर्माण कार्य सुरु झाले आणि 1975 मध्ये रशियन उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या मदतीने प्रक्षेपित केलं गेलं. ह्याप्रमाणे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली.
 
डॉ. विक्रम साराभाई यांचा विवाह सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी स्वामिनाथन ह्यांच्यासोबत झाला होता. ह्या दोघांनी कलाचे प्रचार आणि शिक्षणासाठी 1949 मध्ये  'दर्पण अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' ह्याची स्थापना केली. ह्यांनी भारताचे फार्मास्युटिकल उद्द्योगात देखील महत्वाचे योगदान दिले. हे फार्मास्युटिकल उद्योगात इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग आणि ऑपरेशन्स रिसर्च तंत्र लागू करणारे पहिले व्यक्ती होते. ह्यांच्या सतत प्रयत्नांमुळे भारत औषध उद्योगात स्वावलंबी बनले. भारतीय प्रबंधक संस्थान (IIM),अहमदाबाद ह्याची स्थापना करण्यामध्ये देखील ह्यांनी सहकार्य दिलं.
 
1962 मध्ये डॉ. विक्रम साराभाई ह्यांना शांती स्वरूप भटनागर मेडल देण्यात आला. 1966 मध्ये पद्मभूषण आणि 1972 मध्ये पद्मविभूषण दिले गेले. 30 डिसेंबर 1971 मध्ये ह्यांचे निधन झाले.
 
तिरुअनंतपुरम येथील थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (TERLS) आणि संबंधित अवकाश संस्थांचे नामकरण महान शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे करण्यात आले. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे प्रमुख अंतराळ संशोधन केंद्र म्हणून उदयास आले आहे. 1974 मध्ये सिडनीस्थित इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने ठरवले की 'सी ऑफ सेरेनिटी' वरील बेसाल्ट मून क्रेटर आता साराभाई विवर म्हणून ओळखले जाईल.
 
1972 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय टपाल विभागाने एक टपाल तिकीट जारी केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेम विवाहापूर्वी पित्याकडून लेकीची हत्या