Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जागतिक ग्राहक दिन अर्थात ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा

जागतिक ग्राहक दिन अर्थात ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा
, सोमवार, 15 मार्च 2021 (08:54 IST)
ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्त्वाचा घटक झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण ह्या ग्राहकाची फसवणूक केली जाते. एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी वस्तू मोफत मिळवा. अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मिळवा. चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षीशे मिळवा. भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल. अश्या प्रकाराची जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. 
 
वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. यासाठी रेरा कायदाही अमलात आला आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नाचे निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी आहे.
 
1 फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
2 वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.
3 वस्तू खरेदी करताना बिल मागावे.
4 सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.
5 डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
6 वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.
7 पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.
8 ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.
9 वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.
 
ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. अनेकदा खरेदी करताना किंवा मिळणाऱ्या सर्व्हिसच्या बाबतीत त्याचा वापर करताना ग्राहक अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फायदा विक्रेते करतात. ग्राहक या नात्याने आपणास अनेक अधिकार दिले आहे. या अधिकारांची माहिती घेऊन आपण जागरूक ग्राहक बनू शकता. सरकार कडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. फसवणूक झाल्यावर तक्रार कुठे करावी. कोणाकडून फसवणूक झाल्यावर आपण संबंधित विक्रेतेला धडा कसे शिकवू शकता आणि नुकसानाची भरपाई कसे मिळवू शकता.
 
आज 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. या निमित्ताने ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jaagograhakjago. gov.in ही वेबसाइट सादर केली आहे. या वेबसाइटवर ग्राहकाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. 
 
त्याशिवाय ग्राहकांचे अधिकार, तक्रार, सर्व माहिती मिळू शकेल. या वेबसाइटवर कुठल्याही कंपनीची तक्रार करणं सोपे आहे. ग्राहक टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करू शकतात. त्याच बरोबर केलेल्या तक्रारीची स्थिती ग्राहक वेबसाइट द्वारे ट्रेक करू शकतात.
 
ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्यानुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तूची गुणवत्ता, प्रमाण आणि दर्जा जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहे.  
 
ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा घेण्यात आला आणि त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन .एफ.केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठीचे एक व्यासपीठ तयार केले.जागतिक स्तरांवर त्याचा पाठपुरावाही केला. त्याला यूनेस्कोकडून मान्यता मिळवली. त्या वर्षीपासून दरवर्षी 15 मार्च हे जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा आणि पाळला जातो.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज राज्यपालांच्या उपस्थितीत वेबिनार