Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Health Day : कोरोना संकट काळात जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

World Health Day : कोरोना संकट काळात जाणून घ्या या दिवसाचा इतिहास
, मंगळवार, 6 एप्रिल 2021 (10:48 IST)
World Health Day : 7 एप्रिल अर्थात जागतिक आरोग्य दिनावर संपूर्ण जग Coronavirus सारख्या प्राणघातक व्हायरसला लढा देत आहे. अशात जागतिक आरोग्य ‍दिनाचं महत्तव अजूनच वाढून जातं. जाणून घ्या या दिनाबद्दल संपूर्ण माहिती-
 
जागतिक आरोग्य दिन कधी सुरू झाला?
1950 साली World Health Day ची सुरुवात जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO द्वारा करण्यात आली होती. या दिवशी WHO चा स्थापना दिन असतो, ज्यांच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. डब्ल्यूएचओ संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग आहे. जगातील आरोग्याच्या समस्येवर देखरेख ठेवणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे WHO चे मुख्य कार्य आहे.
 
​WHO कधी सुरू झाले?
7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. तेव्हा WHO सोबत 61 देश जुळलेले होते. याची पहिली बैठक 24 जुलै 1948 रोजी झाली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात आहे. 1950 साली World Helath Day साजरा करण्याची सुरुवात झाली.
 
​जागतिक आरोग्य दिनाचे उद्दीष्ट काय आहे?
1950 पासून हा दिन साजरा करण्यामागील उद्दीष्ट जागतिक स्तरावर आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करणे आहे. केवळ चर्चा नव्हे तर आरोग्य सेवा आणि आरोग्याशी संबंधित अफवा किंवा गैरसमज देखील दूर करणे देखील आहे. WHO विविध देशांमधील सरकारांना आरोग्य धोरणे तयार आणि अंमलात आणण्यासाठी प्रेरित करतं.
 
​WHO चे उत्तम कार्य
आपल्या स्थापना काळापासून आतापर्यंत WHO ने स्मॉल पॉक्स सारखे आजार नष्ट केले आहे. भारत सरकारने देखील पोलिओसारख्या मोठ्या आजारावर विजय मिळविला आहे. या व्यतिरिक्त TB, HIV, AIDS आणि Ebola यासारखे जीवघेणे रोग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्नही केले जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी अनेक देश डब्ल्यूएचओ बरोबर काम करत आहेत.
 
WHO चं उद्देश
WHO चं उद्देश लोकांना त्यांच्या आरोग्याप्रती जागरूक करणे आहे. या ‍दिनानिमित्त आपण प्रण केला पाहिजे की आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्याल. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, उपचार, निरोगी जीवनशैली, योग्य ज्ञान प्राप्ती, आणि जागरुक राहणे हे सर्व महत्त्वाचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पळून गेलेल्या कोरोना बाधित कैद्यावर गुन्हा