Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
, मंगळवार, 7 एप्रिल 2020 (12:09 IST)
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या संघटनेमध्ये 192 देशांचा सहभाग आहे. दक्षिणी अमेरिकेत ब्राजील, युरोपात कोपनहेगन डेन्मार्क, दक्षिण पूर्व एशियात दिल्ली, अमेरिकेत वाशिंग्टन, आशियात इजिप्त आणि पश्चिमेस फिलिपिन्स अश्या सहा जागीस ह्याचे कार्यालय आहे. 
 
लोकांच्या आरोग्यविषयक समस्येचे निरसन करणे ह्या संघटनेचा मुख्य हेतू आहे. ह्या मध्ये मानसिक, शारीरिक अवस्था समजून आरोग्याचा विचार करणे समाहित आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे, त्यांना आरोग्यविषयक वैधकीय मदत पुरवणे आदी कामे केली जातात. 7 एप्रिल हा या संघटनेचा स्थपणा दिवस असतो जो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या संघटने तर्फे एक विषयाची निवड केली जाते. त्या संदर्भात चर्चा, परिसंवाद, पथनाट्य केले जाते आणि रोगाविषयी लोकांमध्ये जण जागृती निर्माण केली जाते. 
 
ह्या वर्षी आपणास सर्वाना माहिती आहे की कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. भारतातच काय संपूर्ण विश्व या आजाराने त्रस्त आहे. जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अजून ही अनेकोच्या संख्येने लोक या आजाराने ग्रसित आहे. सम्पूर्ण देश या आजाराशी लढत आहे. या साठी सर्व डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संघटन लागले आहे. हा आजार एक वैश्र्विक महामारी म्हणून घोषित केला गेला आहे. या व्हायरसची लागण एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्ती कडे लागत आहे. ह्याचे संक्रमणला वाढण्यापासून   रोखण्यासाठी चिकित्सक आणि सर्व आपल्या आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. ह्याचा बचावासाठी घरातच राहून आपण आपला बचाव करू शकतो. शासनाकडून किंवा शास्त्रज्ञां कडून दिलेल्या सूचनेचं काटेकोर पालन करावं. 
 
या आजाराची सुरुवात चीनचा वुहान शहरातून झाली. त्यापासून हा रोग सर्वत्र पसरला आहे. या आजारांसाठी सध्या काहीही औषध नाही. जागतिक आरोग्य संघटनेने हे वर्ष कोरोनाव्हायरस ग्रसित महामारी हे वर्ष घोषित केले आहे. या पासून बचावासाठी सांगितल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. घरीच रहा, सुरक्षित राहा गर्दी टाळा, प्रशासनाला सहकार्य करा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स