Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Laughter Day का साजरा करतात जागतिक हास्य दिन

World Laughter Day का साजरा करतात जागतिक हास्य दिन
, रविवार, 2 मे 2021 (12:57 IST)
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या दबावाखाली आम्ही विसरूनच जातो की आम्ही मनसोक्त केव्हा हसलो होतो. जेव्हाकी हसणे आम्हा सर्वांसाठी फारच महत्त्वाचे आहे, तरी ही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हसण्याने आपले आयुष्य निरोगी आणि आनंदी राहतं.
 
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. या दिनाची सुरुवात मुंबई येथूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी 10 मे 1998 या दिवशी डॉ. मदन कटारिया यांनी साजरा केली होता. आता जवळपास 100 देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. 
 
जागतिक हास्य दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत जागरूक करणे हाच आहे. 
 
हसण्याचे फायदे
हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्त प्रवाह देखील चांगल्या प्रकारे होतो.
हसताना, शरीरातून रासायनिक द्रव्य एंडॉर्फिन सोडले जाते. आणि हे द्रव्य आपल्या हृदयाला मजबूत बनवते. 
हसण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.
हसण्याने आपल्याला अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती खूप मजबूत होते.
हास्य ध्यान योग केलल्याने दिवसभर आनंदात जातं.
मन प्रसन्न असल्यास रात्री चांगली झोप लागते.
हास्य योगामुळे मधुमेह, पाठीचे दुखणे आणि तणावग्रस्त व्यक्तींना आराम मिळतो.
हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. 
दररोज एक तास हसण्याने 400 कॅलरीज ऊर्जाचा वापर होतो, ज्यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रणात राहतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाम निवडणूक: पुन्हा कमळ फुलणार, पण मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स