Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Red Cross Day : का खास आहे हा दिवस

World Red Cross Day
08 मे रोजी जगभरात वर्ल्ड रेड क्रॉस डे साजरा केला जातो. उल्लेखनीय आहे की रेडक्रॉस एक संस्था आहे, जी युद्ध दरम्यान जखमी आणि आकस्मिक अपघात आणि आपत्काल स्थितीत मदत करते. तसेच लोकांना आरोग्याप्रती जागरूक करते. 
 
रेड क्रॉसची स्थापना जीन हेनरी डयूनेन्ट यांनी 1863 साली केली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात येतो. याचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. जीन हेनरी डयूनेन्ट यांना मानव सेवेसाठी 1901 मध्ये पहिला नोबेल पुरस्‍कार (Nobel Prize) देण्यात आला होता. 
 
रेड क्रॉसने प्रथम आणि द्वितीय विश्व युद्धात आपली महत्त्वाची भूमिका निभावत जखमी सैनिकांची आणि नागरिकांची मदत केली होती. या कार्यांमुळेच 1917 मध्ये या संस्थेला नोबेल शांती पुरस्काराने विभूषित केले होते. तसे तर रेड क्रॉस जगभरात आपत्तीग्रस्त लोकांसाठी कार्य करते परंतू हल्ली भारत आणि बांगलादेश मध्ये आलेल्या फानी चक्रीवादळ दरम्यान देखील रेड क्रॉसने लोकांची मदत केली.
 
अजूनही रेड क्रॉस आणि रेड क्रीसेंट लोकांची कशा प्रकारे मदत करावी याचा अंदाज घेत आहे. प्रभावित लोकांची शक्य तितकी मदत केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रोटिन पावडर खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?