Cyclone Mocha Update: भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की चक्रीवादळ 'मोचा' या आठवड्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशाला धडकेल. आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून, मोचा चक्रीवादळ निर्माण होत आहे.
हवामान खात्यानं म्हटले आहे की चक्रीवादळ 9-10 मे पर्यंत तीव्र होईल आणि उत्तरेकडे, मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकेल.
हवामान खात्यानं पुढील 5 दिवस आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्यावर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, लडाख, काश्मीर, सिक्कीम, ओडिशा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, मेघालय, आसाम, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा येथे वाऱ्याचा वेग30-40 किमी प्रतितास आहे. यासोबतच या राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.