मराठी भाषा दिन हा दिन जगातल्या सर्व मराठी भाषिक साजरा करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मराठी कवी कवींवर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले "कुसुमाग्रज" यांचा जन्म दिवस असतो. यांना गौरवपूर्ण मान देण्यासाठी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.
जागतिक मराठी अकादमीने या कार्याचा पुढाकार घेऊन हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून जाहीर केला. तत्पश्चात शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. मराठी भाषा ब्रह्मविद्या आहे असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. मराठी भाषा ही इंडो-युरोप मधल्या भाषा कुळातली एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ही राजभाषा आहे. मराठी भाषी लोकसंख्येनुसार भारतातील चौथी भाषा मराठी आहे.
मराठी भाषा दिवस हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. विष्णू वामन शिरवाडकर हे श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रज या नावाने त्यांचे काव्यलेखन आहे. पुणे येथील त्यांचा जन्म झाला असून जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहे. विशाखा हा काव्य संग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी सामील आहे.