Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

AAI Recruitment 2021 ITI उर्त्तीण तरुणांसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसची सोनेरी संधी

AAI Recruitment 2021 ITI उर्त्तीण तरुणांसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसची सोनेरी संधी
, बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (11:56 IST)
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (AAI) ITI पास तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राधिकरणाने शिकाऊ उमेदवाराच्या 90 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी नुकतीच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड भरती चाचणी / गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिला जाईल.
 
भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - 1 नोव्हेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021
भरती चाचणी / गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची तारीख - अद्याप निर्णय घेतलेला नाही
 
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
विमानतळ प्राधिकरणाच्या मते, ज्या उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे ते काही पदांसाठी अर्ज करू शकतात. तर इतर पदांवर, संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संपादन केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिसूचना पाहू शकता.
 
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
तुम्ही शिकाऊ उमेदवाराच्या या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असल्यास, तुम्हाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट www.aai.aero/en ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला करिअर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यावर या भरतीशी संबंधित माहिती तुमच्या समोर येईल. तुम्हाला त्यामध्ये अर्ज करण्याची सूचना आणि लिंक मिळेल. तुम्हाला येथे परीक्षेचा संपूर्ण नमुना आणि अभ्यासक्रम देखील मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जंक फूड क्रेव्हिंग कमी करण्यात मदत करेल ही एक वस्तू