मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी बॉम्बे एचसीने स्टेनोग्राफर हॉयर ग्रेड व स्टेनोग्राफर लोअर ग्रेड पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. इच्छुक उमेदवार बॉम्बे हाय कोर्टाच्या अधिकृत वेबसाइट bhc.mahaonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. स्टेनोग्राफर भरतीसाठी 18 फेब्रुवारी ते 05 मार्च 2021 पर्यंत अर्ज करता येईल. मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफरच्या दोन्ही पदांसाठी तीन-तीन भरती आहेत अर्थात एकूण सहा नियुक्ती आहेत. यासाठी अर्ज शुल्क 200 रुपये आकाराण्यात येत आहे.
पदांची तपशील
स्टेनोग्राफर हॉयर ग्रेड- तीन उमेदवारांची निवड होईल तसेच तीन उमेदवारांना प्रतिक्षा सूचीसाठी निवडलं जाईल.
स्टेनोग्राफर लोअर ग्रेड- तीन उमेदवारांची निवड होईल तसेच तीन उमेदवारांना प्रतिक्षा सूचीसाठी निवडलं जाईल.
शैक्षणिक योग्यता
बॉम्बे हाय कोर्टात स्टेनोग्राफर पदांवर नोकरीसाठी उमेदवारांना ग्रेज्युएट असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इच्छुक उमेदवारांना कार्य अनुभव असावा.
वयोमर्यादा
किमान 21 वर्षे- कमाल 38 वर्षे
महत्त्वाच्या तारखा
उमदेवार या पदांवर 18 फेब्रुवारी 2021 ते अंतिम तिथी 05 मार्च 2021 पर्यंत अर्ज करु शकतात.
पगार
स्टेनोग्राफर (हायर ग्रेड) साठी, 41800 ते 132300 रुपये दरमहा
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) साठी, 38600- 122800 रुपये दरमहा
या प्रकारे करा अर्ज
अधिकृत वेबसाइट bhc.mahaonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. https://bhc.mahaonline.gov.in/FORMS/Home.aspx
निवड प्रक्रिया
टायपिंग स्पीड व साक्षात्काराच्या आधारावर निवड केली जाईल.