Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज
, शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (16:35 IST)
कोणत्याही देशासाठी ऊर्जा महत्त्वाची गरज आहे. देशाचा विकास ऊर्जेच्या नियोजनावर अवलंबून असतो.
ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच पर्यावरण आणि ऊर्जा ही दोन अशी क्षेत्रे आहेत जेथे करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे. काय आहे ही संधी, कुठला अभ्यास  त्यासाठी करायचा, कोणत्या प्रकारच्या नोकर्‍या मिळतात पाहू...
 
आवश्यक कौशल्ये
ज्यांना पर्यावरणात आणि ऊर्जा क्षेत्रात करिअर करायचं त्यांना पुढील कौशल्ये आत्मसात करावी लागतील -
व्यवस्थापन कौशल्य, तांत्रिक कौशल्ये, संशोधन, समस्या सोडवण्याचे कौशल्य, कटिबद्धता, झोकून देण्याची 
वृत्ती, मेहनत, नेतृत्व कौशल्य. 
 
पात्रता
उमेदवार ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येईल.
पदवीपूर्व अभ्यासक्रम : विज्ञान शाखेतून किमान 50 ते 60 टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण
पदव्युत्तर अभ्यासक्रम : विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेतून किमान 50 किंवा 60 टक्के गुणांनी 12 वी उत्तीर्ण
 
जॉब प्रोफाइल
ऊर्जा किंवा पर्यावरणसंबंधी अभ्यासक्रमची पदवी असेल तर अनेक खासगी, सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी
मिळू शकेल. या शाखांमध्ये पदव्युत्तर कोर्स केल्यानंतर पीएचडी देखील करता येईल.
या शाखांमधील जॉब प्रोफाईल अशी असेल - एन्व्हायर्नमेंटल स्पेशालिस्ट, एनर्जी मॅनेजर, रिसर्च
असोसिएट, सेफ्टी ऑफिसर, स्ट्रॅटेजी ऑफिसर, एनर्जी मॅनेजमेंट स्पेशालिस्ट, प्रोजेक्ट इंजिनिअर, एनर्जी ऑडिटर, फिल्ड इंजिनिअर.
अभ्यासक्रम शिकवणार्‍या काही संस्था आणि अभ्यासक्रमाचे नाव एमडीआय गुरुग्राम मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. 
कोर्सचं नाव - पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राक इन एनर्जी मॅनेजमेंट
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी - सर्टिफिकेट कोर्स इन एनर्जी टेक्निक अँड मॅनेजमेंट 
एससीडीएल पुणे - सिंबॉयसिस
सेंटर फॉर डिस्टंट लर्निंग - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिन्युएबलएनर्जी मॅनेजमेंट
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, अहमदाबाद - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंटल अँड सस्टेनेबर एनर्जी
एसआयआयबी पुणे - सिंबॉसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस - एमबीए इन एनर्जी एन्व्हायर्नमेंट  
 
वेतन
भारतात फ्रेशर्सचा पगार वार्षिक 4 ते 15 लाख या टप्पत असतो. खासगी क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रापेक्षा अधिक पगार असतो. अनुभव आणि पदानुसार पगार वाढत जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे