Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य प्रदेशात 2850 पदांवर भरती, जाणून घ्या पगार

मध्य प्रदेशात 2850 पदांवर भरती, जाणून घ्या पगार
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (09:21 IST)
राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन (NHM), एमपीने सामुदायिक स्वास्थ्य अधिकारी अर्थात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. आता यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येईल.
 
शैक्षणिक पात्रता
कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराला B.Sc (नर्सिग) किंवा पोस्ट बेसिक बीएसी असणे आवश्यक आहे.
 
वयोमर्यादा
21ते 40 वर्ष. आरक्षित वर्गासाठी वयात सूट असेल.
 
निवड प्रक्रिया
ऑनलाइन लिखित परीक्षेद्वारे निवड केली जाईल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा.
 
पगार
कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदांवर निवड झालेल्या उमदेवारांना 25,000 रुपये प्रति मास पगार मिळेल. तसेच प्रशिक्षण किंवा इंटर्नशिप काळ संपल्यावर 15,000 रुपये प्रति मास प्रदर्शन आधारित इंसेंटिव्ह देण्यात येईल.
 
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सामान्य ज्ञान - ट्रेनची साखळी ओढल्यावर ट्रेन का थांबते ?