Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रीम कोर्टात ज्युनियर ट्रांसलेटर साठी भरती, त्वरा करा

सुप्रीम कोर्टात ज्युनियर ट्रांसलेटर साठी भरती, त्वरा करा
, बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (13:17 IST)
सुप्रीम कोर्टात ज्युनियर ट्रांसेलटर च्या 30 जागांसाठी भरती केली जात आहे. नोटिफिेकेशनप्रमाणे हिंदी, इंग्रेजी, ऊर्दू या व्यतिरिक्त इतर क्षेत्राय भाषा बोलणार्‍यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. अर्ज करण्यची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे.
 
हिंदी, आसामी, बंगाली, तेलगू, गुजराती, उर्दू, मराठी, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, मणिपुरी, उडिया, पंजाबी व नेपाली भाषा समजणार्‍यांसाठी जागा रिकाम्या आहेत.
 
शिक्षण
या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे बॅचलर डिग्री यासह इंग्रेजी-हिंदी किंवा संबंधित भाषेत ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असावे. तसेच दोन वर्षाच्या ट्रांसलेशन अनुभवासह कॉम्पयुटरची माहिती असणे देखील गरजेचे आहे.
 
वयोमर्यादा
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे निर्धारित करण्यात आले आहे.
 
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तिथी- 15 जानेवारी 2021
अर्ज करण्याची अंतिम तिथी- 13 मार्च 2021
 
निवड
ज्युनियर ट्रांसलेटर पदांवर उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारावर केली जाईल.
 
पगार
निवड केलेल्या उमेदवारांना मॅटिक्रस लेव्हल 7 च्या आधारावर पगार मिळेल. ज्या अंतर्गत बेसिक सैलरी 44900 रुपये प्रति मास असेल.
 
या प्रकारे करा अर्ज
या पदांवर अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येईल. इच्छुक व योग्य उमेदवार अधिक माहितीसाठी येथे क्लिक करुन नोटिफिकेशन बघू शकतात.
 
अधिकृत वेबसाइट : https://main.sci.gov.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. https://jobapply.in/Sc2020Translator/

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यायप्रिय व कर्तव्यकठोर शिवाजी