महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड रायगड येथे काही रिक्तपदांसाठी भरती सुरु आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री). या पदांसाठी ही भरती सुरु होणार आहे. या साठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज पाठवायचे आहे.
पदांचा तपशील-
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री
शिकाऊ उमेदवार तारतंत्री
एकूण जागा -66
पात्रता-
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री साठी -
इच्छुक उमेदवाराने दहावी पर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
शिकाऊ उमेदवार तारतंत्रीसाठी-
इच्छुक उमेदवाराने दहावी पर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
कागदपत्रे-
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पडताळणीसाठी पत्ता-
पेण मंडळ कार्यालय, अंतोरा रोड, पेण.
अर्ज पडताळणीची तारीख - 29 ते 30 ऑगस्ट 2022