Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Police Recruitment : राज्यात 17 हजार 531 पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर

maharashtra police
, बुधवार, 27 मार्च 2024 (12:11 IST)
Police Recruitment : राज्यात 17,531 पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली असून या भरती साठी 5 मार्च पासून अर्ज मागविण्यात येत हे. या अर्जासाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली असून पूर्वी अंतिम मुदत 31 मार्च होती. आता मुदत वाढवली असून आता 15 एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे. 
सविस्तर माहितीसाठी  policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर भेट द्या.

पदांचा तपशील - 
 9,595 पोलीस शिपाई पदे,
1,686 चालक पोलीस शिपाई पदे
4,449 सशस्त्र पोलीस शिपाई पदे
101 बॅंण्डसमन पदे
1 हजार 800 कारागृह पोलींस शिपाई पदे 
तर सर्वाधिक पदे बृहन्मुंबई पोलीस दलात आहे. 
 
उमेदवारांनी  policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावे. 
या भरतीसाठी राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित घेतली जाणार आहे. उमेदवारांनी सम्पूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो. उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल. 
 
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 40 टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
 
शारीरिक आणि लेखी चाचणी मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
 
पोलीस भरतीच्या अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल.
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ अर्थतज्ञ चन्द्रशेखर टिळक यांची दोन दिवसांची व्याख्यानमाला