Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SAI Recruitment 2021 कोच आणि असिस्टंट कोच पदांवर भरती

SAI Recruitment 2021 कोच आणि असिस्टंट कोच पदांवर भरती
, मंगळवार, 20 एप्रिल 2021 (11:52 IST)
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने कोच आणि असिस्टंट कोचच्या पदांवरील भरती अर्ज मागिवले आहेत. यासाठी SAI नोटिफिकेशन जारी केलं आहे. अर्ज करण्याची शेवटली तारीख 20 मे 2021 आहे. विस्तृत माहिती जाणून घ्या-
 
पदांची तपशील
कोचची एकूण 100 रिक्त पदे 
असिस्टंट कोचची एकूण 220 पदे रिक्त 
 
योग्य व इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट sportsauthorityofindia.nic.in वर जाऊन विस्तृत नोटिफिकेशन पाहू शकतात. 
 
पात्रता
कोच पोस्ट साठी-
उमेदवारांकडे SAI, NS NIS किंवा अन्य मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून कोचिंगचा डिप्लोमा असणे आवश्यक
किंवा ऑलिम्पिक/वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल विनर असणे आवश्यक
किंवा दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवलेला असणं आवश्यक
किंवा ऑलम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक
 
असिस्टंट कोच पदासाठी-
इच्छुक उमेदवारांनी SAI, NS NIS किंवा अन्य मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून कोचिंग डिप्लोमा
किंवा ऑलम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता
 
वयोमर्यादा
कोच साठी उमेदवारांचे कमाल वय 45 वर्ष आणि असिस्टंट कोच पदासाठी कमाल वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे. 
 
या प्रकारे करा अर्ज 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट sportsauthorityofindia.nic.in वर जा. 
होमपेज वर उपलब्ध Job Opportunities लिंक पर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडल्यावर येथे अप्लाय आणि जॉब लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
 
आपण अधिकृत वेबसाइट वर 20 एप्रिल 2021 पासून ते 20 मे 2021 पर्यंत अर्ज करु शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'Six Minute Walk Test' फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी अशी करावी चाचणी