Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SSC Stenographer Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून स्टेनोग्राफर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, पात्रता,वयो मर्यादा जाणून घ्या

jobs
, सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (10:43 IST)
SSC Stenographer Recruitment 2022 :स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D परीक्षा, 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करावा, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. ऑनलाइन फी भरण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे. एसएससी भरतीसाठी संगणक आधारित परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये होणार आहे. अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी वाचा आणि अधिक माहिती मिळवा.
 
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, "स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी च्या रिक्त जागा केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभाग/संस्थांमध्ये आहेत ज्यात देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयांचा समावेश आहे." सर्व उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो  .
 
वयो मर्यादा -
स्टेनोग्राफर ग्रेड C साठी: अर्जदारांचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे.
स्टेनोग्राफर ग्रेडD साठी: उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
 
पात्रता-
 उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
 
अर्ज फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये अनिवार्यपणे भरावे लागतील. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWD) आणि माजी सैनिक (ESM) मधील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Masala Pasta मसाला पास्ता