Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फाऊण्डेशन... मेकअपचा बेस

फाऊण्डेशन... मेकअपचा बेस

वेबदुनिया

आजच्या काळात मेकअप हा सौंदर्याचा एक अविभाज्य हिस्सा आहे. आजकाल कोणत्याही कार्यक्रमाला जाताना अगदी तो छोटा असुदे किंवा मोठा मेकअप हा असतोच. पण हा मेकअप करत असताना आपण काळजी घेणे जरुरी असते. साधारणपणे मेकअपची सुरुवात ही फाऊण्डेशन लावून केली जाते. ते वापरताना नीट काळजी घ्यावी. मेकअप करताना फाऊण्डेशन लावलं जातं. पण, फाऊण्डेशन निवडताना आणि लावताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
 
१) आपल्या त्वचेच्या रंगानुसार फाऊण्डेशनचा प्रकार आणि शेड निवडावी लागते. फाऊण्डेशन विकत घेताना ते सर्वप्रथम आपल्या हाताला लावून पाहावे, असे केल्याने आपल्याला त्याचा रंग लगेच लक्षात येतो.
 
२) योग्य त-हेने लावलेलं फाऊण्डेशन तुम्हाला सुंदर आणि नॅचरल लूक मिळवून देतं. फाऊण्डेशन हे जर चेह-यासारखे किंवा चेह-याला सुट करणारे नसले तर ते काही विचित्र दिसू शकतं.

webdunia
WD


३) फाऊण्डेशन घेताना ते तुमच्या त्वचेच्या रंगाजवळ जाणारं असेल असंच निवडावे. फाऊण्डेशनचे अनेकविध प्रकार उपलब्ध आहेत.

४) तुमची त्वचा सामान्य प्रकारातली असेल, तर तुम्ही जेल स्वरुपातील फाऊण्डेशन निवडणं योग्य ठरते. कोरड्या त्वचेसाठी क्रीम स्वरुपातील फाऊण्डेशन निवडावे. हे ऑइल बेस्ड असल्याने तुमच्या त्वचेला यातून मॉइश्चरायझर मिळतं. तर तेलकट त्वचा असणा-यांनी स्टिक फाऊण्डेशन घ्यायला हवं. कारण लावल्यानंतर हे फाऊण्डेशन लगेच सुकून जातं. लिक्विड फाऊण्डेशन सगळ्याच प्रकारच्या त्वचेला सूट होतं. चेह-याला एक लाइट शेड यामुळे मिळते खरी पण, तुमच्या चेह-यावर काही डाग वगैरे असतील तर ते लपले जात नाहीत.

५) डोळ्यांखालची डार्क सर्कल्स लपवण्यासाठी फाऊण्डेशनऐवजी कन्सिलर वापरा. फाऊण्डेशनच्या शेडचंच कन्सिलर घ्या. चेह-यावरील पिंपल्स, डाग यामुळे लपवणं शक्य होतं.

webdunia
WD
६) फाऊण्डेशन लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि मऊ सुती कापडाने पुसून घ्यावा. खरखरीत कापडाने चेहरा कधीच पुसू नये. चेह-याची त्वचा अतिशय नाजूक असल्याने चेह-याला ईजा होऊ शकते. चेहरा आणि मानेवर बर्फ चोळा. कापसाच्या बोळ्यावर फाऊण्डेशन घेऊन कपाळ, गाल, नाक आणि हनुवटीवर थेंब थेंब लावावे. ब्रश किंवा शक्यतोवर बोटांचा आणि तळव्याचा वापर करून चेह-यावर नीट पसरून लावावे.

७) स्टिकचा वापर करताना ते चेह-यावर थेट लावा आणि पाण्याचे थेंब घेऊन चेहऱ्यावर नीट पसरवा. फाऊण्डेशनचा बेस तयार झालेल्या चेह-यावर आता तुम्ही छान मेकअप करू शकता. व्यवस्थित फाऊण्डेशन लावलेले असेल तरच मेकअप नीट बसतो आणि सौंदर्य आणखी खुलून दिसते.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अ‍ॅपल बदाम खीर