जेव्हा फॅशन आणि कंफर्टेबल आऊटफिटची गोष्ट येते तेव्हा डेनिमचा नंबर सर्वात आधी लागतो. मात्र सध्या डेनिमसोबत आणखी एक फॅशन आली आहे ती म्हणजे लेगिंग्सची. सध्या मुली आणि महिलांमध्ये डेनिमसोबतच लेगिंग्सची खूप चलती आहे. केवळ कुर्तीवरच नव्हे वेस्टर्न आऊटफिटवरही मुली हल्ली लेगिंग्स घालण्याला मोठ्या संख्येने पसंती देत आहेत. लेगिंग्स घालणे मुलींना कंफर्टेबल वाटते मात्र ते घालण्याचेही काही नियम आहेत. लेगिंग्स घालताना काही नियम पाळले पाहिजेत नाहीतर लहानशा चुका तुमचा लूक बिघडवू शकतात. त्यामुळे Legging घालताना या चुका करू नका.
क्रॉप टॉपसोबत लेगिंग्स कधीही घालू नका. कारण हे दिसण्यास योग्य दिसत नाही. याचे कारण म्हणजे लेगिंग्सचे मटेरिअल खूप सॉफ्ट असते जे आपल्या शरीराला चिकटून बसते. दरम्यान क्रॉप टॉपसोबत लेगिंग्स घातल्यास तुमचे कर्व्हस गरजेपेक्षा जास्त दिसतील जे दिसण्यास चांगले वाटणार नाही.
लेगिंग्ज घातल्यावर त्या आपल्या स्किन आणि बॉडीला चिकटतात. त्यामुळे लेगिंग्स घालताना अशा पँटी अथवा अंडरवेअर घाला ज्याची हेमलाईन लेगिंग्सच्या वर दिसणार नाही. असे झाल्यास तुम्हालाच ते कंफर्टेबल वाटणार नाही. तसेच दिसण्यासही ते फार विचित्र वाटेल आणि तुमचा संपूर्ण लूक बिघडून जाईल.
तुमच्या लेगिंग्स कधीही चुडीदारप्रमाणे दिसता कामा नये. जर तुम्ही पायाच्या घोट्याजवळ एकत्र चुन्नी येतील अशा लेगिंग्स घालत असाल तर ते दिसण्यास खूप विचित्र दिसते. त्यामुळे पायाच्या उंचीनुसार लेगिंग्स निवडा.
जर तुची लेगिंग्स ब्लॅक अथवा एखाद्या न्यूट्रल कलरची असेल तर त्यावर ब्राईटकलरचा टॉप घालू नका. यामुळे तुम्ही जर ब्राईट टॉप आणि लेंगिग्स घातली तर तुमचा लूक मिस मॅच होईल. यासोबतच लेगिंग्सवर बॉडी हँगिंग टॉप घालू नका. लेगिंग्ससोबत नेहमी सैलसर टॉप घालणे नेहमीच चांगले.