Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'नव्वदीच्या डेनिम फॅशन'चे पुनरागमन..!

'नव्वदीच्या डेनिम फॅशन'चे पुनरागमन..!
, बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (16:23 IST)
असं म्हणतात कि इतिहासाची पुनरावृत्ती होते, आणि हे फॅशनच्या बाबतीतही लागू होते. ९० च्या दशकातील फॅशनचा हा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो, त्याकाळी अनेक नवीन फॅशन स्टाईलची ओळख आणि विविध ट्रेंडचा जन्म झाला आणि त्या आजही आजच्या फॅशनशी संबंधित वाटतात. काही विंटेज ट्रेंड क्लासिक असतात आणि कधीही फॅशनच्या दुनियेतून बाहेर फेकले जात नाहीत. हाय वेस्टपॅंटपासून ते नेहमीच्या क्लासिक डेझी ड्यूक्स आणि व्हिंटेज वॉश डेनिमपर्यंत, आमचे डिझाइन तज्ज्ञ - अभिषेक यादव, डिझाईन हेड, स्पायकर लाइफस्टाइल आणि नेल्सन जाफरी, हेड ऑफ डिझाईन लिवा, यांनी ९० च्या दशकाच्या शैलीत हि कसे स्टायलिस्ट दिसावे या बद्दल काही सूचना दिल्या आहेत.
 
हाय वेस्ट पँट्स : हाय वेस्ट पँट्स जीन्सच्या व्यतिरिक्त ९० च्या फॅशननिस्टांनी देखील हाय वेस्ट पॅलाझोस आणि पँट्स खूप प्रसिद्ध केली. व्हिस्कोस सामग्री पासून बनलेली मुलायम कापडाचे कपडे निवडा. स्टाईलिश लुकसाठी त्यांना पॉपलिन क्रॉप टॉपसह परिधान करा आणि पायामध्ये ब्लॉक हील्स घाला.
 
जॅकेट्स आणि कोट्स: स्त्रिया, कळत- नकळत काही फॅशन स्टेटमेंट्स साठी किंचित जास्त आकार असलेले कोट्स आणि जॅकेट घेतात. जॅकेट्स इतर सामान्य पोशाखांपेक्षा उत्कृष्ट रचना आणि अनेक लेयर (स्तर) जोडलेले असतात, त्यामुळे ते अधिक बोल्ड आणि स्टायलिश दिसते. यामध्ये तुम्हाला अधिक आराम मिळण्यासाठी व्हिस्कोस मॉडेल मिश्रित कपडे घेऊ शकता. जाकीट सोबत प्लेड स्कर्ट किंवा काही स्ट्रेट कट पॅन्टसह परिधान करू शकता.
 
विंटेज जीन्स: फॅशन मध्ये ९० चे दशक उत्साहाने पुन्हा आले आहे. व्हिंटेज जीन्सच्या चांगल्या जोडीमध्ये आधुनिक कटसह व्हिंटेज लुक आहे. आता तुम्ही नवद्दीची २०१९ मध्ये सुधारित विंटेज डेनिम बाजारामध्ये सहज खरेदी करू शकता. व्हिंटेज डेनिम प्री-एजेड पासून प्रेरित आहे, जी वयाच्या १८ व्या वर्षाचा अनुभव देते आणि तसेच विंटेज कलेक्शन परिपूर्ण बनवते. अधिक चांगल्या लूकसाठी विंटेज डेनिम प्लेड शर्ट किंवा पांढरा टी-शर्ट आणि पायामध्ये कॉम्बट बूटसह परिधान करा.
 
ओव्हरऑल (सैल पायजमा) : ९०च्या फॅशन आठवणी ओव्हरऑल (सैल पायजमा) शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. तुम्ही ते एका पट्ट्यासह किंवा दोन्ही पट्ट्यांसह परिधान करू शकता किंवा स्लीव्हलेस टर्टलनेक, प्लेड शर्ट आणि डॅड स्नीकर्ससह आपले सर्व आवडते ९०चे ट्रेंडी कपडे एकत्र करून भन्नाट लूक्स मिळवू शकता. त्यांचा तिरस्कार करा किंवा त्यावर प्रेम करा, 90 चा ओव्हरऑल ट्रेंड पुन्हा आले आहे यात शंका नाही.
 
बॉम्बर जॅकेट: ९० च्या दशकात बॉम्बर जॅकेटचा ट्रेंड प्रचंड होता आणि आता अलीकडच्या हंगामात तो खूपच चांगला पुनरागमन करत आहे. एथलिझर आणि स्ट्रीटवेअर फॅशनच्या दिशेने आकर्षित करणार्‍या फॅशन इंडस्ट्रीचे आभार मानले पाहिजेत. बॉम्बर जॅकेट मुळात मोठ्या आकारात आणि बॅगी स्टाईलचा असतो, हा जॅकेट कट्स असलेल्या जीन्स आणि स्नीकर्ससह परिधान केल्यास उत्कृष्ट दिसतात. तुम्हाला युनिक आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर हे एक उत्तम पोशाख आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध