Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध
वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं गोड पदार्थ खाणे टाळतात परंतू अलीकडे झालेल्या एका अध्यननात समोर आले आहे की गोड पदार्थ खाल्ल्याने नव्हे तर गोड पेय पिण्याने वजन वाढतं. अतिरिक्त साखर मिसळलेल्या ठोस वस्तूंनी त्या प्रमाणात वजन वाढत नाही जेवढं लिक्विड ड्रिंक्सने वाढतं.
 
युके आणि चायनाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या या शोधाप्रमाणे जगभरात पेय पदार्थांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या शोधात भोजनाच्या प्रकाराने वजनावर प्रभाव पडतो का यावर शोध घेतला गेला. या शोधाप्रमाणे पाण्यात साखर घोळून पिणार्‍यांचे शुगर लेवल अधिक प्रमाणात वाढलेले होते जेव्हा की साखरेचं तेवढं प्रमाण ठोस पदार्थाद्वारे दिल्याने वजनात आणि शुगर लेवलमध्ये काहीच फरक नव्हता.
 
तर नक्की काय करावे?
नवीन शोधाप्रमाणे आपल्याला गोड खाण्याची आवड असेल तर आपल्याला लिक्विड डायटवर नियंत्रण ठेवावं लागेल. लिक्विड डायटमुळे आपलं वजन लवकर वाढून शरीराचा आकार बिघडत जाईल. हल्ली कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, इतर शेक पिण्याचं ट्रेड सुरू असल्यामुळे कमी डायट असली तरी वजन काही कमी होत नाहीये म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
कोल्ड ड्रिंक्स आणि सोडा ड्रिंक्समध्ये शुगर अधिक प्रमाणात असतं म्हणून याचे सेवन टाळावे.
दिवसातून दोनापेक्षा अधिक वेळा चहा, कॉफीचे सेवन करू नये. हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरेल कारण यात कॅफीन असतं.
सरबत आणि साखर घोळून तयार केले जात असलेले ड्रिंक्स घेणे टाळा. याने आपल्या शरीरात अचानक शुगरचे प्रमाण वाढू शकतं आणि याने किडनी, हार्ट आणि लिव्हरवर वाईट परिणामाला सामोरा जावं लागू शकतं.
पेय पदार्थांमध्ये वरून साखर घालून पिणे टाळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा