जीवनशैली कितीही व्यस्त असो, काळाबरोबर स्टाइलिश दिसणे आजकालची गरज आहे, स्टाइलिश दिसण्याने आत्मविश्वास देखील बळकट होतो.
आज काही अशा कपड्यां विषयी सांगत आहोत ज्यांना परिधान करून आपण देखील स्टाइलिश दिसू शकता.
1 प्लाझो पॅन्ट-
हे आकर्षक असण्यासह आरामदायी असतात, हे आपल्या वार्डरोब मध्ये आवर्जून ठेवा. ह्याच्या वर कॅज्युअल टॉप्स किंवा पारंपरिक कुर्ती दोन्ही घातल्या जातात. प्रसंगानुसार परिधान करून टँडी दिसा.
2 मॅक्सी ड्रेस -
हे अत्यंत आरामदायी असतात, कोणत्याही हंगामात ते परिधान करून स्टाइलिश दिसू शकता. हे सर्व प्रकारच्या शरीरावर चांगले दिसते.याचा सह फुटवेयर मध्ये हिल्स,फ्लॅट्स पासून पांढरे स्नीकर्स देखील चांगले दिसतात.
3 शॉर्ट्स-
जर कधी आपण शॉर्ट्स घातले नाही तर असं समजावं की आपली फॅशन अपूर्ण आहे. शॉर्ट्स, क्रॉप टॉप,टॅंक टॉप,शर्ट इत्यादींसह हे स्टाइलिश लुक देतात.
4 जंपसूट आणि प्लेसूट्स -
जंपसूट आणि प्लेसूट्स देखील दोन्ही आवडतात. हे दिसायला जेवढे स्टाइलिश आहे तेवढेच परिधान करण्यासाठी आरामदायी आहे.
5 इंडियन कुर्ती -
जर आपण ट्रॅडिशनल घालणे पसंत करता तर इंडियन कुर्तीसह टाइट फिटिंगची लैगिंग आणि जीन्स वापरू शकता. हे देखील खूप स्टाइलिश दिसतात.
6 स्कर्ट -
महिलांना आपल्या वॉर्डरोब मध्ये शरीराच्या आकारानुसार स्कर्ट देखील असावा. स्कर्ट आपण ऑफिस मध्ये आउटिंग इत्यादी कोणत्याही वेळी परिधान करून स्टाइलिश दिसू शकता.