Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtrian Bride : मराठी वधूच्या शृंगारात या ८ वस्तु असतात खास

marathi vadhu
, शनिवार, 2 मार्च 2024 (15:30 IST)
भारतामध्ये वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आणि मान्यता आहे. भारतात विविधतेत एकता आहे. भारताची संस्कृति हे खूप सुंदर आहे. तसेच प्रत्येक परंपरा वेगवेगळ्या आहे. ज्यामध्ये काही परंपरा या वैदिक आहे तर काही परंपरा या सामाजिकतेमधून निर्माण झाल्या आहे. तसेच आपल्या भारतात सांस्कृतिक वंशपरंपरामध्ये वेद वर्णित सोळा संस्कार बद्द्ल वर्णन मिळते. या सोळा संस्कारांनी भारताच्या इतिहासाला आपलेसे केले आहे. 
 
तसेच जन्मापासून अंतिम क्रिया पर्यंत या सोळा संस्कारांपैकी एक विशेष संस्कार आहे विवाह. ज्याचे विशेष महत्व आहे. विवाह एक विशेष संस्कार आहे. ज्यात संपूर्ण भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा पहायला मिळतात. जिथे विवाहची भावना एकच आहे तिथे विवाहची चाली, वेशभूषा, परंपरा सर्व वेगवेगळे पहायला मिळते.
 
भारतातील सर्व राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील वधूचे मराठमोळे रूप सुंदर दिसते. मराठी वधू  आपल्या शृंगारात ८ वस्तूंचा उपयोग करून आपले सौंदर्य खुलवते. व सांस्कृतिक समृद्धतेचा परिचय देते. 
 
मराठी वधूचा श्रृंगार- वयात येणारी प्रत्येक मुलगी आपल्या विवाहाची वाट पाहत असते. विवाहनंतर प्रत्येक मुलीला आपले घर सोडावे लागते तसेच मुलीसाठी ही नविन सुरवात देखील असते. प्रत्येक मुलगी आपल्या विवाहाच्या दिवशी मी सुंदर कशी दिसेल याचा विचार करत असते. विवाहाच्या दिवशी काय काय घालायचे? हे आधीपासूनच ठरवले जाते. मराठी वधूचा सुंदर लुक नजरेस पडतो. मराठी वधू प्रत्येक दागिने निवडून घेते. चला तर जाणून घेऊ या ८ वस्तु कोणत्या वस्तु मराठी वधू शृंगारात वापरते.
 
मुंडावळ्या- मुंडावळ्या या महत्वाच्या आभूषणांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील वर-वधु आपल्या शृंगारात मुंडावळ्या घालतात. सुंदर अश्या मोतींनी  बनलेल्या मुंडावळ्या या शुभ प्रतिक मानल्या जातात. मुंडावळ्या ह्या वर-वधु च्या कपाळावर बांधल्या जातात. मुंडावळ्या कपाळावर बांधल्यावर वर-वधु यांच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते . 
 
आंबाडा(जुडा)- आजकालच्या वधु प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटच्या हेयर स्टाइल सारखी हेयर स्टाइल करत आहेत. तसेच मराठी मूली आपल्या विवाहित जुडा घालतात आजही महाराष्ट्रात विवाह समारंभात जुडा प्रसिद्ध आहे. जुडा घातल्यावर चेहऱ्याचे सौंदर्यात भर पडते . 
 
चंद्रकोर- भारत वर्षात टिकलीचे विशेष महत्व आहे. पण मराठी महिलांसाठी चंद्रकोर शुभ मानली जाते. जी ऑथेंटिक मराठी टिकलीचे स्वरुप आहे तसे पाहिला गेले तर भारतात गोल टिकलीचा जास्त उपयोग होतो. पण चंद्रकोर ही ऐतिहासिक स्वरुपाने श्रेष्ठ मानली गेली आहे. मराठी वधूसाठी चंद्रकोर खास मानली जाते. 
 
नथ- भारतीय महिलांच्या शृंगारात सर्वात लोकप्रिय दागिन्यांमध्ये नथ ही असते भारतातील वेगवेगळ्या भागातील महिला वेगवेगळी नथ घालतात. ज्यात मराठी नथ ही वेगळी आणि खास आहे. नथमुळे मराठी वधूच्या सौंदर्यात भर पडते 
 
तनमणी- तनमणी हा प्रत्येक वधूच्या दागिन्यांपैकी एक महत्वाचा दागिना असतो तनमणी हा सौभाग्याचे लेण असतो. तनमणीने वधूचे सौंदर्य खुलते. मराठी वधु मध्ये तनमणीचे अनेक डिझाइन प्रचलित आहे. तनमणी मराठी वाधुला सुंदर रूप देतो मराठी वधूचा विशेष श्रृंगार तिच्या दिसण्याला अजुन सुंदर बनवतो. 
 
बाजूबंद- बाजूबंद हा मराठी वधूच्या दागिन्यांपैकी एक सुंदर दागिना आहे. हाताच्या दंडाला घालण्यात येणारा बाजूबंद हा मराठी महिला विशेषकरून सण, विवाह इत्यादि वेळेस घालतात. बाजूबंद हा मराठी वधूच्या तयारीला शोभुन दिसतो. 
 
हिरवा चूडा- बांगडया या भारतातील प्रत्येक महिलाचे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या बांगडया प्रसिद्ध आहे. तसेच आज देखील मराठी वधू ही काचेचा हिरवा चूडा घालते जे सौभाग्याचे लेण असते. हिरवा चूडा हा शुभ मानले जातो. हिरवा चूडयाचा आवाज माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानला जातो .
 
शालू- आजच्या काळात देखील मराठी वधू या विवाहत शालूला प्राधान्य देतात. सुंदर अशी डायमंड किंवा गोल्डन डिझाइन केलेला शालू घातल्यावर मराठी वधू चे सौंदर्य अप्रतिम दिसते. शालू हा विशेष करून मराठी वधू विवाहाच्या वेळेस घालते. 
 
पैठाणी- महारष्ट्रातील पैठाणी हे एक महावस्त्र समजले जाते. पदरावर मोर असलेले पैठाणी ही प्रत्येक मराठी महिलेचे आवडते वस्त्र आहे. आताच्या काळात पुष्कळ मराठी वधू या पैठाणी घालायला प्रधान्य देतात. 
 
नऊवारी(पातळ)- काही भागांमध्ये नऊवारी साडीला बोली भाषेत लुगडे देखील बोलतात. सध्याच्या काळात मराठी वधू विशेष करून विवाहात मंगलाष्टकच्या वेळी नऊवारी घालतात.  नऊवारी घालून त्यावर जुडा घालतात यामुळे मराठी वधूच्या सौंदर्य खुलून दिसते.  

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या