आजच्या काळात लठ्ठपणा कोणाला आवडतो. दुबळे होण्यासाठी बरेच प्रयोग केले जाते, लोक जिम जातात, योगा करतात.डायटिंग करतात.आपण दुबळे दिसण्यासाठी योग्य कपड्यांचा वापर करून लठ्ठपणा लपवू शकता. या साठी या 3 गोष्टी लक्षात ठेवा.
1 रंगाची योग्य निवड- दुबळे दिसण्यासाठी लोक फिकट रंग निवडतात. हे चुकीचे आहे. जर आपण लठ्ठपणा लपवू इच्छिता तर गडद रंगाच्या कपड्यांची निवड करा. काळे, तपकिरीच्या व्यतिरिक्त आपण निळे,पिवळे,किंवा गुलाबी रंगाची निवड करू शकता. स्लिम दिसण्यासाठी फिकट रंगाची निवड करू शकता. आपण गडद आणि फिकट रंग मिश्रण करून देखील परिधान करू शकता.
2 फेब्रिक - जर लठ्ठपणा कमी होत नाही तर आपण योग्य फेब्रिक परिधान करून ते लपवू शकता. आपण जॉर्जेट,सॅटिन,शिफॉन, चे फेब्रिक परिधान करू शकता. चटक, तारे, लागलेले फेब्रिक वापरणे टाळा. या मुळे लठ्ठपणा अधिक दिसून येतो.
3 प्रिंट्स ची योग्य निवड- लक्षात ठेवा की प्रिंटचा देखील खूप प्रभाव पडतो. जर आपण मोठे प्रिंट असलेल्या ड्रेसची निवड करता तर त्यामध्ये आपण जास्त लठ्ठ दिसता. म्हणून प्रयत्न करा की प्रिंटेड ड्रेस परिधान करत आहात तर लहान आणि बारीक प्रिंटचा वापर करा.