Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्षांसाठी काही फॅशन टिप्स

नवीन वर्षांसाठी काही फॅशन टिप्स
, सोमवार, 30 डिसेंबर 2019 (14:47 IST)
नवीन वर्ष 2020 आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्या साठी आपले नवीन वर्षांसाठीं नियोजन केल्या जातील. फॅशन ला समजणारे लोकं पार्टी साठीं आगोदरच ड्रेस तयार करतात . त्या साठीं आम्ही आपणास काही फॅशन टिप्स देत आहोत. ज्यामुळे आपण स्टायलिश दिसू शकता. आपण ह्या आधी वर्ष 2019 मध्ये हे ड्रेसेस वापरले नसतील तर ह्या वर्षी नक्की वापरून बघा.
 
नवीन वर्षाच्या फॅशन टिप्स: 2019 चा हा लोकप्रिय फॅशन ट्रेंड नक्कीच करून पहा
 
टाइअप टाउजर्स :
ह्या वर्षी टाइअप टाउजर्स चा ट्रेंडच होता. हा ऑफिस लुक असल्याने सहज वापरता येऊ शकते. रंगी बिरेंगी टाइअप टाउजर्स सह आपण स्टायलिश दिसू शकता.
 
प्लीटेड स्कर्ट :
प्लीटेड स्कर्ट परिधानां साठीं  खूपच आरामदायक आहे. आणि आपल्याला एक अभिजात लुक देते. आपण शर्टसह प्लीटेड स्कर्ट देखील घालू शकता. सहली ला जातांना आपण टीशर्ट सह प्लीटेड स्कर्ट देखील परिधान करू शकता.
 
स्ट्रिप ड्रेस :
पूर्वीकाळी  स्ट्रिप ड्रेस ऑफिस लूकसाठी सर्वोत्कृष्ट मानला जात होता, पण सरत्या काळात स्ट्रिप ड्रेस  डेनिम शॉर्टसह वापरण्यात आला. ह्या वर्षी हा फॅशन ट्रेंड लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला.
 
सीक्विन साड़ी :
इथे आपण कापड्यांच्या संदर्भात बोलत आहो आणि सिक्किन साडी बाबत चर्चा नाही हे कशे शक्य आहे. आपण पार्टी मध्ये ह्या साडीचा वापर करू शकता. ही साडी दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर असते.
 
रफल लुक :
ह्या वर्षी  रफल लुक चे वर्चस्व होते. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर रफल साडी, रफल टॉप, रफल ब्लाऊज, गाजवले  येत्या वर्षातही आपण हे वापरू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चमकदार नितळ त्वचेसाठी घरघुती नैसर्गिक उपाय