फेंग म्हणजे वायू आणि शुई म्हणजे जल अर्थात फेंगशुई शास्त्र जल आणि वायूवर अवलंबून आहे. आज आम्ही आपल्याला फेंगशुईच्या त्या सोप्या टिप्स सांगत आहोत ज्या अमलात आणून आपण आपल्या दांपत्य जीवनात रोमांच अनुभवाल आणि घरात सुख- समृद्धी नांदेल.
लव बर्ड ठेवा बेडरूममध्ये
लव बर्ड, मैंडरेन डक असे पक्षी प्रेमाचे प्रतीक असून यांच्या लहान मुरत्यांचं जोडपं आपल्या बेडरूममध्ये ठेवावं. याने दांपत्य जीवनात सुख येतं.
मातीच्या पॉटमध्ये लावा झाडं
घरात सुख नांदावे म्हणून तीन हिरवे झाडं मातीच्या कुंड्यात घरातील पूर्व दिशेत ठेवावे. फेंगशुईत बॉन्सायी आणि कॅक्टस हानिकारक आहे हे ध्यानात असू द्या.
झूमर लावा
दांपत्य सुखासाठी बेडरूमच्या दक्षिण- पश्चिम दिशेत क्रिस्टल ग्लासने तयार झाडफानूस वापरावे.