मिठाने दूर करा नकारात्मकता

फेंगशुईप्रमाणे घरातील नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी मीठ हे सर्वात उत्तम वस्तू ठरेल.
 
घराला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करण्यासाठी पूर्वीकडे मातीच्या भांड्यात मीठ भरून ठेवावे आणि प्रत्येक चोवीस तासाने मीठ बदलत राहावे.
 
तसेच घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी बांबूचे झाड योग्य ठरेल. घरात बांबू लावल्याने कुटुंबातील सदस्यांना दीघार्यु आणि उत्तम आरोग्य लाभतं. घरातील बैठकीत जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र होतात तिथे बांबू लावायला हवे. बांबू बैठकीच्या पूर्वी कोपर्‍यात ठेवायला पाहिजे.
 
फेंगशुईप्रमाणे ड्रॅगन घराची रक्षा करतं. म्हणून घरात ड्रॅगनची मूर्ती किंवा चित्र ठेवायला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING