स्वस्थ शरीरात देवाचा निवास असतो. जर कोणी व्यक्ती स्वस्थ नसेल तर तो देवाने निर्माण केलेल्या मानव शरीर रचनेचे आनंद घेऊ शकत नाही. मग तुम्ही करोडपती असो की अरबपती, जर व्यक्तीचे आरोग्य उत्तम नसेल तर मग ते धन कोणत्या कामाचे? म्हणूनच धर्म शास्त्रांमध्ये देखील आरोग्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तुम्ही जर वास्तू शास्त्राचे ऐकले तर वास्तूच्या या सोप्या सोप्या उपायांना अमलात आणून तुम्ही आजारांपासून स्वत:चे रक्षण करू शकता.
जाणून घेऊ निरोगी राहण्याचे 5 सोपे उपाय -
1. शयनकक्षाकडे लक्ष द्या
शयनकक्ष घरातील अशी जागा असते जेथे व्यक्ती आराम करतो आणि आपला जास्त वेळ तेथे घालवण्याचा प्रयत्न करतो. बर्याच वेळा आम्हाला असे जाणवतं की आम्हाला शयनकक्षात गाढ झोप येत नाही किंवा सकाळी उठल्यानंतर देखील असं वाटत असतं की आपली झोप पूर्ण झालेली नाही आहे. तर याचा अर्थ स्पष्ट असतो की शयनकक्षात नकारात्मक ऊर्जा येत आहे आणि ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला आजारी करू शकते, म्हणून शयनकक्ष कधीपण पूर्णपणे बंद नाही करायला पाहिजे. सकाळी शुद्ध वार येण्यासाठी खोलीत योग्य खिडकी असायला पाहिजे. शयनकक्षात खरखटे भांडे जास्त वेळेपर्यंत नाही ठेवायला पाहिजे. तसेच जर शयन कक्षात नकारात्मक फोटो लावला असेल तर तो लगेचच काढून टाकावा.
2. झोपताना डोकं उत्तर आणि पाय दक्षिणेकडे नको
रात्री झोपताना जर गाढ झोप येत नसेल तर तुम्ही स्वत:ला आजारी बनवत आहे. वस्तूनुसार गाढ झोप व्यक्तीला बर्याच आजारांपासून दूर ठेवते. रात्री झोपताना लक्ष ठेवा की तुमचं डोकं उत्तर आणि पाय दक्षिणेकडे नसावे. या दिशेत झोपल्याने डोकदुखी आणि अनिंद्रेचे आजार, व्यक्तीला त्रस्त करू लागतात.
3. जेवताना टीव्हीचा प्रयोग करणे टाळावे
जेवण करताना व्यक्तीला टीव्ही बघणे टाळायला पाहिजे. कारण व्यक्तीचे जेवणात लक्ष लागत नाही तो पूर्णपणे टीव्हीत रमलेला असतो. वास्तूनुसार टीव्हीमधून नकारात्मक ऊर्जा निघते जी आमच्या मस्तिष्क आणि मनावर प्रतिकूल प्रभाव सोडते.
4. शौचालय आणि स्वयंपाकघर जवळ नको
व्यक्तीचे जास्त करून आजार स्वयंपाकघरातूनच येतात. घर विकत घेताना या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे की घरात शौचालय आणि स्वयंपाकघर जवळ जवळ नको. वास्तूमध्ये असे होणे, आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
5. घरात नक्की लावा तुळशीचा पौधा आणि सूर्याची पेंटिंग
वास्तूनुसार तुळशीचा पौधा स्वत:मध्ये एक अचूक औषध आहे. जर घरात तुळशीचा पौधा असेल तर हा लहानसा उपाय बर्याच मोसमी आजारांना दूर ठेवण्यात मदतगार ठरतो. तसेच सूर्याची पेंटिंग किंवा क्रिस्टल देखील नकारात्मक ऊर्जेला व्यक्तीपासून दूर करतो.