Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्षासाठी फायदेशीर ठरतील हे 10 वास्तू टिप्स, जरूर वापर करून बघा

नवीन वर्षासाठी फायदेशीर ठरतील हे 10 वास्तू टिप्स, जरूर वापर करून बघा
, गुरूवार, 3 जानेवारी 2019 (00:22 IST)
नवीन वर्ष आपल्या जीवनात आनंद आणि सुख आणेल या अपेक्षेने आपण बरेच उपाय करतो. त्या सबोतच तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता :  
 
1. घराच्या मुख्य दारापासूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा आदान प्रदान सुरू होतो. म्हणून घरातील दारावर चांदीने बनलेले स्वस्तिक लावावे ज्याने घरात सकारात्मकता येते.  
 
2. धन देवता कुबेराचे घर उत्तर दिशेत असते तर या वर्षी उत्तर दिशेला सशक्त बनवा.  
 
3. घरात झाड झुडपं लावल्याने सकारात्मक ऊर्जेला जागा मिळते. ही पूर्व दिशेचे दोषांना दूर करून संतुलन बनवण्याचे काम करतात.  
 
4. घरातील उत्तर, पूर्वेकडून कचरा फेकून, जुने कपडे व इतर वस्तूंना हटवून द्या, यामुळे घरात क्लेश होतो.  
 
5. घरात असे चित्र जसे वीरानं घर, भांडण, पतझड इत्यादी नकारात्मक गोष्टींना वाढवतात त्याच्या जागेवर मनाला उत्साह, आनंद, उमंग, शांती व तरोताजा करणारे चित्र लावावे.  
 
6. जल तत्त्व संबंधी चित्रांना झोपण्याच्या खोलीत लावू नये.  
 
7. दक्षिण-पश्चिमांमध्ये आरसा नाही लावायला पाहिजे. यामुळे बनत असलेले काम शेवटच्या टप्प्यात येऊन पूर्ण होत नाही.  
 
8. घरातील दक्षिण दिशेत जलतत्त्व किंवा निळा रंग नसावा. पण जर ते फारच गरजेचे असेल तर हिरवा आणि लाल रंगांचा मिश्रण किंवा फक्त लाल रंगाचा प्रयोग केला पाहिजे.  
 
9. नवीन वर्षात जमिनीची खरेदी करताना त्याच्या आजूबाजूचे रस्ते आणि त्याचा उतार कोणत्या बाजूला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. असे प्लॉट नाही घ्यायला पाहिजे ज्यावर दक्षिण-पश्चिमेकडून रस्ता येत असेल. दक्षिण दिशेला रस्ता असणारे प्लॉट विकत नाही घ्यायला पाहिजे. दक्षिण-पश्चिम दिशेला कापणारा प्लॉट देखील नाही विकत घ्यायला पाहिजे.  
 
10. दक्षिण दिशेच्या स्वयंपाक घरात पांढर्‍या रंगाचा कलर केल्याने वास्तू दोष दूर होण्यास मदत मिळत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता