... तर या घटनेमुळे समर्थ बनले रामदास

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (17:00 IST)
महाराष्ट्राचे दैवत प्रौढ प्रतापी पुरंदर भव्य राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ श्री रामदास होते. समर्थांशी प्रभावित होऊन राजेंनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत घातले. त्यावर समर्थानी आपल्या अंगावरचे भगवे वस्त्र फाडून राजेंच्या मुकुटावर बांधले आणि म्हणाले की हे माझे राज्य जरी असले तरी आपण आता याचा व्यवस्थित सांभाळ करावा. आम्ही विश्वस्त आहोत. 
 
स्वामी रामदास यांचे नावं नारायण सूर्याजी पंत होते. त्यांनी फार लहानपणीच रामाला बघितले अशी किवंदंती आहे त्यामुळेच त्यांचे नाव रामदास झाले. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील जांब या ठिकाणी झाला. त्यांनी फाल्गुन कृष्ण नवमीला समाधी घेतली म्हणूनच रामदासांचे अनुयायी दास नवमी म्हणून ही नवमी साजरी करतात.
 
 
नारायणाचे संतांच्या रूपात रूपांतरण :-
नारायण म्हणजेच समर्थ बालपणी फार खोडकर होते. त्यांचा घरी गावकरी तक्रार घेऊन जात असे. एके दिवशी त्यांची माता राणूबाई त्यांना म्हणाल्या की आपण दिवसभर मला त्रास देतास, आपले थोरले बंधू दिवसभर कामाला जातात. त्यांना घराविषयी काळजी असे. आपणास कुठलीही काळजी नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि ते घराच्या एका अंधाऱ्यात कोपऱ्यात जाऊन ध्यान लावून बसले. दोन-तीन दिवस शोधून झाल्यावरही ते सापडले नाही तर ते आपणच बाहेर आले. कुठे होतेस विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की मी इथेच घरातच ध्यानमग्न होऊन संपूर्ण जगाची काळजी करत होतो. त्यानंतर त्यांनी सांसारिक मोहमायेतून निवृत्ती घेतली आणि संन्यासी झाले. 
 
छत्रपतींवर त्यांचा फारच प्रभाव होता. छत्रपतींने हिंदू धर्माचे शिक्षण आणि हिंदवी साम्राज्याचे धडे त्यांचा कडूनच शिकले. शिवाजी आपल्या प्रत्येक कार्यात त्यांचा सल्ला घेत असे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी