आज महालक्ष्मी पर्व अर्थात गजलक्ष्मी व्रत आहे. हा दिवस दिवाळीपेक्षा देखील शुभ मानला गेला आहे. पितृ पक्षात येणार्या गजलक्ष्मी व्रतात आपल्या राशीनुसार विधी-विधानाने पूजन केल्यास महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते आणि जीवनात धन-समृद्धी येते. तर जाणून घ्या कोणत्या राशीच्या जातकांनी कशा प्रकारे पूजा करावी.
मेष
मेष राशीचे जातक कर्जामुळे परेशान असतील तर त्यांनी मातीच्या हत्तीसमोर 'ऋणहर्ता मंगल स्तोत्र' पाठ करावे याने कर्ज फेडण्यास मदत होते.
वृषभ
या राशीच्या जातकांनी गजलक्ष्मी व्रतापासून प्रत्येक शुक्रवार श्री विष्णू-लक्ष्मी यांचे पूजन केल्याने धन व सन्मानाची प्राप्ती होते. हा प्रयोग किमान एका वर्षापर्यंत करावा अर्थात पुढील वर्षीच्या गजलक्ष्मी व्रतापर्यंत करत राहावा.
मिथुन
चांदीचा हत्ती तयार करवून श्री लक्ष्मीच्या मंत्रांनी पूरित करून आपल्या तिजोरीत ठेवल्याने निश्चित धनलाभ होईल. धनाचा भांडार भरलेला राहील आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रसन्न आणि सुखी राहील.
कर्क
रात्री केळीच्या पानांवर दूध-भात ठेवून चंद्र आणि मातीच्या हत्ती दाखवून मंदिरात पंडिताला दान करावे. याने धन प्राप्तीचे प्रबल योग बनतात.
सिंह
मातीचा हत्ती तयार करून त्यावर चांदी किंवा सोन्याचे दागिने चढवावे आणि 'ॐ नमो नारायणाय’ मंत्राचा श्री विष्णूंसमोर जप करावा, विशेष धनलाभ होईल.
कन्या
लाजावर्त नग चांदीत जडवावा आणि लक्ष्मी मंत्रांनी अभिमंत्रित करून मातीच्या हत्तीला चढवावा. याने जातक श्रीमंत होण्याची शक्यता वाढते.
तूळ
चांदी किंवा सोन्याच्या हत्तीला कमळाचं फुल अर्पित करावं. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि यश मिळतं.
वृश्चिक
मातीच्या हत्तीसमोर तूप आणि मोहरीच्या तेलाचे दोन मोठे दिवे लावावे. कोणत्याही लक्ष्मी मंत्राच्या 21 माळ जपाव्या तर अक्षय धनाची प्राप्ती होते.
धनू
सुंदर पिवळे वस्त्र धारण करून मातीच्या हत्तीवर विविध अलंकार अर्पित करावे. देवी लक्ष्मीच्या कृपेचा चारी बाजूला वर्षाव होईल.
मकर
हत्तीला सव्वा डझन केळी खाऊ घाला आणि मातीच्या हत्तीला वस्रालंकार अर्पित करा. प्रत्येक बाधा दूर होईल आणि धन वाढेल.
कुंभ
चांदीचा हत्ती तयार करून त्याची पूजा करावी. सोबतच मातीच्या हत्तीची पूजा करून दिवे लावावे. चांदीचे शिक्के अर्पित करावे. यश, सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य आणि सौभाग्याने जीवन चमकेल.
मीन
11 हळदीच्या गाठी पिवळ्या कपड्यात गुंडाळून लक्ष्मी मंत्राच्या 11 माळ जपून तिजोरी ठेवाव्या. दररोज तेथे दिवा लावावा तर व्यापारात प्रबळ प्रगती होते.