Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नृसिंह जयंती: 7 थंड वस्तू अर्पण करा आणि चमत्कार बघा

webdunia
मंगळवार, 5 मे 2020 (15:55 IST)
नृसिंह जयंती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशीला साजरी केली जाते. भगवान नृसिंहाच्या जन्माचे हे सण आहे. ज्या वेळी विष्णूंना राग आला होता त्यावेळी त्याने हे रुद्रावतार घेतले होते. हे रुद्रावतार त्यांनी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी घेतले होते. या रुद्रावताराने नृसिंहाच्या अंगाची लाही लाही झाली होती. त्यासाठी त्यांना थंड वस्तू अर्पण केल्या जातात. 
 
वेगवेगळ्या वस्तूंना अर्पण करून भाविकांना वेगवेगळी फळ प्राप्ती होते. तसेच नृसिंह जयंतीला हे उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात. या दिवशी सकाळी अंघोळ करून नृसिंहाच्या देऊळात जाऊन त्यांची पूजा करण्याचा नियम असे. चंदन आणि फुलांनी नृसिंहाची पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
 
नृसिंह जयंतीसाठी उपाय -
1 आपल्या पैशांना वाचविण्यासाठी नृसिंहाला नागकेशर अर्पण केले जाते. त्यामधील नागकेशराला आपल्या बरोबर घेऊन जावे. आणि घरातल्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये जेथे आपण पैसे आणि दागिने ठेवतो तेथे ठेवावे.
 
2 आपल्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास आपल्याला त्याची काही विधी विधान पूजा करता येत नसल्यास या दिवशी नृसिंहाच्या देवळात जाऊन एक मोरपीस अर्पण केल्यास आपल्याला त्वरित आराम मिळेल. 
 
3 कायदाच्या कचाट्यात सापडले असल्यास कोर्टाच्या पायऱ्या चढून दमछाक झाली असल्यास नृसिंह जयंतीला नृसिंहाला दह्याचा नैवेद्य दाखवावा.
 
4 प्रतिस्पर्धेच्या त्रासाने त्रस्त असल्यास तसेच अज्ञात शत्रूंचे भय होत असल्यास बर्फाचे पाणी नृसिंहाला अर्पण करावे आपल्याला सर्व दृष्टीने यशःप्राप्ती होईल. 
 
5 आपल्या पासून कोणी दुरावलेले असल्यास किंवा आपल्या नात्यात दुरावा आल्या असल्यास नृसिंहाचा देऊळात मक्याचे पीठ दान करावे.
 
6 आपण कर्जबाजारी झाले असल्यास किंवा आपले पैसे कुठे अडकलेले असल्यास नृसिंहाला चांदी किंवा मोती अर्पित करावे.
 
7 दीर्घ काळापर्यंत आजारी असल्यास किंवा तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नसल्यास नृसिंहाला चंदनाचा लेप अर्पण करावा.
 
विशेष: मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरात मनोभावे पूजा करून या वस्तू अर्पित कराव्या.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

नृसिंह जयंती विशेष : या दिवशी काय करावे जाणून घ्या