Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वसंत पंचमी पूजा विधी आणि विशेष उपाय

वसंत पंचमी पूजा विधी आणि विशेष उपाय
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (12:47 IST)
सरस्वती व्रत विधी
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली पाहिजे. सकाळी सर्व दैनिक कार्य आटपून देवी भगवती सरस्वतीच्या आराधनाचा संकल्प घ्यावा. नंतर पूर्वाह्न काळात स्नानादी झाल्यावर 
गणपतीची पूजा करावी.

स्कंद पुराणानुसार पांढरे फुलं, चंदन, श्वेत वस्त्रादीने सरस्वतीची पूजा करावी. सरस्वती पूजन करताना सर्वप्रथम त्यांना स्नान घालावे. नंतर कुंकु आणि इतर श्रृंगार सामुग्री अर्पित करावी. नंतर 
फुलमाळा घालावी.
 
देवी सरस्वती मंत्र
गोडाचे नैवेद्य दाखवून सरस्वती कवच पाठ करावा. देवी सरस्वतीच्या पूजा दरम्यान या मंत्राचा जप केल्याने पुण्य प्राप्ती होते.
'श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा'।
 
 
सरस्‍वती श्‍लोक
देवी सरस्वतीची आराधना करतान हा श्‍लोक म्हणावा-
ॐ श्री सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्।।
कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्।
वह्निशुद्धां शुकाधानां वीणापुस्तकमधारिणीम्।।
रत्नसारेन्द्रनिर्माणनवभूषणभूषिताम्।
सुपूजितां सुरगणैब्रह्मविष्णुशिवादिभि:।।
वन्दे भक्तया वन्दिता च।
 
विशेष उपाय-
जर आपलं मुलं अभ्यासात कमजोर असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची विधि-विधानाने पूजा करावी आणि पूजेत हळद एका कपड्यात बांधून मुलांच्या बाजुवर बांधून द्यावे.
 
सरस्वती देवीला 'वाणी ची देवी' असे म्हटले गेले आहे. म्हणून मीडिया, एंकर, अधिवक्ता, अध्यापक व संगीत इतर क्षेत्राशी निगडित लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा अवश्य 
करावी.
 
सरस्वती देवीची पूजा-अर्चना केल्याने मन शांत राहतं आणि भाषेत शुद्धता येते.
 
आपल्या मुलांना चांगले गुण पडावे अशी इच्छा असल्यास मुलांच्या खोलीत सरस्वती देवीचा फोटो लावावा.
 
अत्यंत तीक्ष्ण आणि टोचून बोलणार्‍यांच्या कामात अडथळे निर्माण होतात, अशात त्यांनी सरस्वती देवीची पूजा करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गिरनार म्हणजेच गिरी नारायण