rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुरज चव्हाणच्या लग्न समारंभाला सुरुवात

Suraj chavhan
, शनिवार, 29 नोव्हेंबर 2025 (16:19 IST)
बिग बॉस मराठी ५' चा विजेता आणि रील स्टार सूरज चव्हाण यांच्या विवाह सोहळ्याला आज २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरुवात झाली आहे. सुरज आणि त्यांची होणारी पत्नी संजना गोफणे यांचा विवाहबंधन हा लव्ह मॅरेज असून, तो जेजुरी येथे पार पडणार आहे. लग्न सोहळ्यात मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहे, ज्यामुळे हा सोहळा खास ठरणार आहे.
 
तसेच  सुरज चव्हाण यांचा साखरपुडा नोव्हेंबर महिन्यात पार पडला. तसेच आता विवाहाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  सुरज चव्हाण यांचा हळदी समारंभ २६ नोव्हेंबरला झाला. व मेहंदी समारंभ २७ नोव्हेंबरला पार पडला. संजनाच्या हातावर सुरजच्या नावाची खास मेहंदी काढली गेली, ज्यात "झापुक झुपूक" सारखे डायलॉग लिहिलेले होते. हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तसेच  सुरजने स्वतःच्या सोशल मीडिया वरून "अखेर आनंदाचा दिवस उजाडला" असे सांगितले.
सुरजने बिग बॉसनंतर स्वतःचे घर बांधले असून, लग्नानंतर गृहप्रवेशही लवकरच होणार आहे. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच सुरज चव्हाण यांच्या लग्नाचे मुख्य विधी आणि सोहळा आज, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
 
हा सोहळा खूप मोठा असल्याने या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बॉलिवूडचे मोठे कलाकार देखील हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
ALSO READ: धरमजी एक जिवंत आणि बहुमुखी व्यक्तिमत्व होते, शेखर सुमनने अशी केली आठवण
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणदीप हुड्डाने केली लवकरच पालक होणार असल्याची घोषणा