Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

9 वाजून 41 मिनिटांचे रहस्य काय?

9 वाजून 41 मिनिटांचे रहस्य काय?
मित्रानों, आपण टीव्हीवर जाहिरात तर बघतातच. पण तुम्हाला आयफोनची जाहिरात आठवते का? या जाहिरातीकडे बारकाईनं पाहिले तर प्रत्येक फोनवर 9 वाजून 41 मिनिटं हीच वेळ दाखवली आहे. असं का बरं असावं? हीच वेळ दाखवण्यामागचं नेमकं कारण काय? सहाजिक हा प्रश्न मनात येतो. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना? तर अॅपलनंच याबाबत खुलासा केलाय. 9 वाजून 41 मिनिटं ही वेळ कंपनीनं सहज म्हणून निवडलेली नाही. त्यामागे एक कारण आहे.
जगाला आयफोनचं पहिल्यादा दर्शन याच वेळी झालं होतं. हीच ती वेळ जेव्हा अॅपलनं आपला पहिला फोन लाँच केला होता. आयफोन आणि आयपॅड या दोन्हींच्या जाहिरातीत हीच वेळ दाखवली जाते. 2007 मध्ये मेकवर्ल्ड परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अॅपलचे त्यावेळचे सीईओ स्टिव्ह जॉब्स यांनी ऐतिहासिक सादरीकरण केलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी आयफोन लाँच केला होता. ती वेळ होती सकाळी 9 वाजून 41 मिनटं.
 
आयफोन जगासमोर येताना त्याच्या स्क्रीनवर हीच वेळ का दाखवू नये, असा भन्नाट विचार स्टिव्ह जॉब्स यांच्या कल्पक मनात आला आणि अॅपलनं त्यांचा हा विचार लगेचच अमलात आणला. या कार्यक्रमात त्यांनी 40 मिनिटं आयफोनबद्दल माहिती दिली. त्यानंतर 9 वाजून 41 मिनिटांची सगळ्यांनी या फोनची झलक बघितली. म्हणूनच अॅपलच्या फोनवर हीच वेळ दर्शवली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उच्च रक्तदाब हा पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त धोकादाक