Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुलांच्या आधी विकसित झाली फुलपाखरे

फुलांच्या आधी विकसित झाली फुलपाखरे
पृथ्वीवर फुले विकसित होण्याच्या लाखो वर्षांपूर्वीच फुलपाखरे व पतंग उदयास आले होते. अमेरिकेतील बोस्टन कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी सुमारे 20 कोटी वर्षांपूर्वीच्या पृथ्वीच्या अंगर्भागात गोठलेले खडक आणि मातीच्या ढिगार्‍याच्या नमुन्यांचे अध्ययन करुन याचा शोध लावला आहे. जर्मनीच्या ग्रामीण भागातून गोळा करण्यात आलेल्या या नमुन्यांमध्ये काही असे घयक आढळले आहेत, जे पतंगाच्या पंखांवरही आढळून येतात. यापूर्वी शास्त्रज्ञ असे समजत होते की क्रीटेनस कालखंडामध्ये फुले उमलणारी रोपटी विकसित होण्याच्या पाच ते सात कोटी वर्षांनंतर लेपिडोपटेरा प्रजातीच्या ाया पतंग व फुलपाखरांचा उदय झाला.
 
असे समजले जाते की हे पतंग स्वत:चे पोषण करण्यासाठी फुलांवरच अवलंबून होते. या अध्ययनाचे प्रमुख पॉल स्ट्रोथर यांनी सांगितले की लेपिडोपटेरा फुलांचा विकास होण्याच्या आधी जुरासिक कालखंडात म्हणजे डायनासोरच्या काळापासूनच पृथ्वीर फुलपाखरे अस्तित्वात होती. त्याकाळी हे पतंग व फुलपाखरांनी बीज उत्पादन करणार्‍या रोपड्यांमधून पाण्याचे थेंब शोषून पोषक घयक ग्रहण करु शकणारे अवयव विकसित केले होते. हे संशोधन जीव आणि रोपट्यांच्या सहविकासाचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी हे पतंग बीजांतून पोषक घटक ग्रहण करत होते. फुलांच्या विकासासोबतच फुलांतून निघणारा मकरंद त्यांचा आहार बनला. अशा प्रकारे पतंग फुलांच्या परागीकरणाच्या प्रक्रियेला मदत करु लागले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कच्च्या केळ्याचे थालिपीठ