Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंडे शाकाहारी की मांसाहारी?

अंडे शाकाहारी की मांसाहारी?
अंडे व्हेजिटेरियन की नॉन-व्हेज यावरुन शाकाहारी आणि मांसाहारींमध्ये अनेकदा वाद झडत असतात. मात्र, संशोधकांनी या दीर्घकालीन वादावर उत्तर शोधले आहे. शास्त्रज्ञांच्या मते अंडे हे शाकाहारी आहे. अंडे हे कोंबडी किंवा इतर पक्ष्यांकडून म्हणजे सजीवांकडून मिळत असल्यामुळे नॉन-व्हेजिटेरियन असल्याचा दावा मांसाहारींकडून केला जात असे. मात्र, शास्त्रज्ञांनी हा दावा खोडून काढला आहे.
 
संशोधकांच्या मते अंड्याचे तीन भाग असतात. अंड्याचे कवच अर्थात एग शेल, पिवळा बलक अर्थात एग योक आणि पांढरा भाग अर्थात एग व्हाईट. यात आढळणारे प्रथिने, कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सपासून बनला असतो. आपण जी अंडी दररोज खातो, त्यामध्ये गर्भ नसतो. त्यामुळे पक्षी किंवा प्राण्याची वाढ व्हावी, इतका जीवाचा विकास झालेला नसतो. 
 
कोंबडी सहा महिन्यांची झाली की दर दिवशी किंवा दोन दिवसातून एकदा अंडी देते. अंडे देण्यासाठी नरासोबत तिचे मीलन होण्याची आवश्यकता नसते. अशा अंड्यांमध्ये जीव नसतो. आपण जी अंडी नेहमी बाजारतून विकत आणतो ती अनफर्टिलाईज्ड असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एड्सवर उपयांनी मात